mr_tw/bible/other/lampstand.md

2.8 KiB

दीपस्तंभ (दिवठणी)

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "दीपस्तंभ" या शब्दाचा सामान्यपणे संदर्भ एका रचनेशी आहे, ज्यावर दिवा ठेवला जातो, जेणेकरून तो खोलीला प्रकाश पुरवील.

  • एक सामान्य दीपस्तंभ सहसा एक दीप धारण करू शकतो आणि त्याला मातीपासून, लाकडापासून, किंवा धातूपासून (जसे की कास्य, चांदी, किंवा सोने) ह्यापासून बनवले जाते.
  • यरुशलेमच्या मंदिरात, एक विशिष्ठ सोन्याचे दीपस्तंभ होते, ज्याला सात दिवे धरण्यासाठी सात शाखा होत्या.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर "दिव्याचे आसन" किंवा "दिवा धारण करण्यासाठीची रचना" किंवा "दिवा धारक" असे केले जाऊ शकते.
  • मंदिराच्या दीपस्तंभासाठी, ह्याचे भाषांतर "सात दिव्यांचे दीपस्तंभ" किंवा "सात दिव्यांचे सोन्याचे असं" असे केले जाऊ शकते.
  • पवित्र शास्त्राच्या संबंधित परिच्छेदातील साध्या दीपस्तंभाची छायाचित्रे व सात-शाखांच्या दीपस्तंभांची छायाचित्रे भाषांतरासाठी उपयुक्त ठरतील.

(हे सुद्धा पहा: कास्य, सोने, दीप, प्रकाश, चांदी, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: