mr_tw/bible/other/gold.md

3.5 KiB

सोने, सोन्याचे

व्याख्या:

सोने हा एक पिवळा, उच्च दर्जाचा धातू आहे, जो दागदागिने आणि धार्मिक वस्तू बनविण्यासाठी वापरला जात होता. प्राचीन काळातील तो सर्वात मौल्यवान धातू होता.

  • पवित्र शास्त्राच्या काळात, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुंना घन सोन्यातून बनवले गेले होते किंवा सोन्याच्या पातळ थराने झाकलेले होते.
  • या वस्तूंमध्ये कानातले आणि इतर दागदागिने, मुर्त्या, वेद्या आणि सभामंडप आणि मंदिरामध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर वस्तू, जसे की, कराराचा कोष ह्यांचा समावेश होता.
  • जुन्या कराराच्या काळात, सोने हे खरेदी आणि विक्रीच्या विनिमयाचे साधन होते. त्याची किंमत निश्चित करण्यासाठी ते वजनावर मोजले जात होते.
  • नंतर, सोने आणि इतर धातू जसे की, चांदी ह्यांचा उपयोग सिक्के बनवून ते खरेदी आणि विक्री करताना वापरण्यासाठी केला जात होता.
  • जेंव्हा, जे घन सोने नाही पण त्याला सोन्याचे एक पातळ आच्छादन आहे, अशा कशाचा तरी संदर्भ देताना, "सोनेरी" किंवा "सोन्याचे आच्छादन दिलेला" किंवा "सोन्याचा मुलामा दिलेला" असे शब्द वापरले जाऊ शकतात.
  • काहीवेळा एखाद्या वस्तूचे वर्णन "सोनेरी-रंगाचा" असे केलेले असते, ह्याचा अर्थ त्याला सोन्याचा पिवळा रंग लावलेला आहे, पण कदाचित ते सोन्यापासून बनवलेले नाही.

(हे सुद्धा पहा: वेदी, कराराचा कोश, खोटे देव, चांदी, सभा मंडप, मंदीर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: