mr_tw/bible/other/house.md

5.2 KiB

घराणे (घर), घरात, धाब्यावर (छपरावर), छापरावरचे, कोठारे, भांडारे, घरगुती कर्मचारी

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये "घर" हा शब्द सहसा लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आला आहे.

  • काहीवेळा ह्याचा अर्थ "घराणे" असा होतो, ज्याचा संदर्भ एका घरामध्ये राहणाऱ्या लोकांशी येतो.
  • सहसा "घराणे" ह्याचा संदर्भ एखाद्या व्यक्तीच्या वंशजांशी किंवा इतर नातेवाईकांशी येतो. उदाहरणार्थ,"दाविदाचे घराणे" या वाक्यांशाचा संदर्भ दावीद राजाच्या सर्व वंशजांशी येतो.
  • "देवाचे घराणे" आणि "यहोवाचे घराणे" हे शब्द निवासमंडप किंवा मंदिराला सूचित करतात. या अभिव्यक्ती सामान्यतः देव कोठे आहे किंवा कोठे राहतो ह्याचा संदर्भ देऊ शकतात.
  • इब्रीकरांस पत्र ह्याचा 3 अधिकारामध्ये, "देवाचे घराणे" ह्याचा उपयोग रूपक म्हणून देवाचे लोक किंवा अधिक सामान्यपणे, सर्वकाही जे देवाशी संबंधित आहे ह्यासाठी केला आहे.
  • "इस्राएलाचे घराणे" या वाक्यांशाचा संदर्भ सामान्यपणे संपूर्ण इस्राएलच्या राष्ट्राशी किंवा अधिक सामान्यपणे इस्राएलच्या उत्तरी राज्यातील कुळांशी येतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "घराणे" ह्याचे भाषांतर "घराणे" किंवा "लोक" किंवा "कुटुंब" किंवा "वंशज" किंवा "मंदिर" किंवा "राहण्याचे ठिकाण" असे केले जाऊ शकते.
  • "दाविदाचे घराणे" या वाक्यांशाचे भाषांतर "दाविदाचे कुळ" किंवा "दाविदाचे कुटुंब" किंवा "दाविदाचे वंशज" असे केले जाऊ शकते. * संबंधित अभिव्याक्तींचे भाषांतर सारख्याच प्रकारे केले जाऊ शकते.
  • "इस्राएलाचे घराणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "इस्राएलाचे लोक" किंवा "इस्राएलाचे वंशज" किंवा "इस्राएली" ह्यांचा समावेश होतो.
  • "यहोवाचे घराणे" या वाक्यांशाचे भाषांतर "यहोवाचे मंदिर" किंवा "यहोवाची उपासना करण्याची जागा" किंवा "यहोवा त्याच्या लोकांना भेटण्याचे ठिकाण" किंवा "जिथे यहोवा राहतो" असे केले जाऊ शकते.
  • "देवाचे घराणे" ह्याचे भाषांतर सारख्याच प्रकारे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: दावीद, वंशज, देवाचे घराणे, घराणे, इस्राएलाचे राज्य, निवासमंडप, मंदिर, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: