mr_tw/bible/other/council.md

4.0 KiB

न्यायसभा, न्याय सभांच्या

व्याख्या:

न्यायसभा हा एक लोकांचा समूह आहे, जो महत्वाच्या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी, आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र जमतो.

  • न्यायसभा ही सामान्यतः शासकीय आणि कायमस्वरूपी मार्गाने विशिष्ठ हेतूने भरवली जाते, जसे की कायदेशीर बाबींवर निर्णय घेणे.
  • यरुशलेममधील "यहुदी न्यायसभा" ही "सन्हेन्द्रीन (वरिष्ठ न्यायसभा)" असे म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये 70 सदस्य असतात, ज्यामध्ये यहुदी पुढारी जसे की, मुख्ययाजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक, परुशी, आणि सदुक्की ह्यांचा समावेश होता, जे यहुदी नियमांनुसार प्रकरणांचा निवडा करण्यासाठी नियमितपणे भेटत असत. ही धार्मिक पुढाऱ्यांची हीच न्यायसभा आहे, जिने येशूची परीक्षा घेतली, आणि त्याला मारले जावे असा निर्णय घेतला.
  • इतर शहरांमध्ये सुद्धा छोट्या यहुदी न्यायसभा होत्या.
  • जेंव्हा प्रेषित पौलाला सुवार्ता सांगितली म्हणून अटक करण्यात आली होती, तेंव्हा त्याला रोमी न्यायसभेच्या समोर उभे करण्यात आले.
  • संदर्भाच्या आधारावर "न्यायसभा" या शब्दाचे भाषांतर "कायदेशीर विधानसभा" किंवा "राजकीय विधानसभा" असे केले जाऊ शकते.
  • "न्यायसभेत असणे" ह्याचा अर्थ एखाद्या विशेष सभेमध्ये काहीतरी ठरवण्यासाठी असणे असा होतो.
  • हा शब्द "मार्गदर्शन" ज्याचा अर्थ "चांगला सल्ला" या शब्दापेक्षा वेगळा आहे ह्याची नोंद घ्या.

(हे सुद्धा पहा: विधानसभा, मार्गदर्शन, परुशी, नियम, याजक, सदुक्की, नियमशास्त्राचे शिक्षण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: