mr_tw/bible/kt/scribe.md

3.1 KiB

नियमशास्त्राचे शिक्षक (शास्त्री)

व्याख्या:

शास्त्री हे अधिकृत अधिकारी होते, जे महत्वाचे शासकीय किंवा धार्मिक कागदपत्रे हाताने लिहिण्यास किंवा नक्कल करण्यास जबाबदार होते. यहुदी शास्त्री ह्यांच्यासाठीचे दुसरे नाव "यहुदी नियमशास्त्रातील तज्ञ" हे होते.

  • शास्त्री हे जुन्या करारातील पुस्तकांची नक्कल करण्यासाठी आणि त्यांचे जतन करण्यासाठी जबाबदार होते.
  • त्यांनी देवाच्या नियमांवर केलेले धार्मिक अभिप्राय आणि समालोचन ह्यांची सुद्धा नक्कल केली आणि त्यांचे जतन आणि स्पष्टीकरण केले.
  • एके काळी, शास्त्री हे महत्वाचे शासकीय अधिकारी होते.
  • पवित्र शास्त्राच्या महत्वाच्या शास्त्री ह्यामध्ये बारुख आणि एज्रा ह्यांचा समावेश होतो.
  • नवीन करारामध्ये, ज्या शब्दाने "शास्त्री" या शब्दाचे भाषांतर केले आहे, त्याच शब्दाने "नियमशास्त्राचे शिक्षक" या शब्दाचे देखील भाषांतर केले आहे.
  • नवीन करारामध्ये, शास्त्री हे सहसा "परुशी" या धार्मिक समूहाचा भाग होते, आणि या दोन समूहांचा उल्लेख वारंवार एकत्रित करण्यात आला आहे.

(हे सुद्धा पहा: कायदा, परुशी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: