mr_tw/bible/kt/sadducee.md

2.3 KiB

सदुकी

व्याख्या:

येशू ख्रिस्ताच्या काळात, सदुकी हा एक यहुदी याजकांचा राजकारणी गट होता. त्यांनी रोमी साम्राज्याला पाठिंबा दिला आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवला नाही.

  • बरेच सदूकी श्रीमंत, उच्च दर्जाचे यहुदी होते, जे मुख्य याजक आणि महायाजक यासारख्या शक्तिशाली नेतृत्वाच्या पदावर होते.
  • सदूकींच्या कर्तव्यामध्ये मंदिराच्या परिसराची काळजी घेणे आणि याजकाची कार्ये, जसे की बलिदान अर्पण करणे समाविष्ट होते.
  • सदूकी आणि परूश्यांनी जोरदारपणे रोमी अधिकाऱ्यांना येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी प्रभावित केले.
  • येशू या दोन गटांच्या स्वार्थीपणामुळे आणि ढोंगीपणामुळे त्यांच्या विरुद्धात बोलला.

(हे सुद्धा पहा: मुख्य याजक, परिषद, महायाजक, ढोंगी, यहुदी पुढारी, परुशी, याजक)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: