mr_tw/bible/other/consume.md

4.3 KiB

नाश करणे (विध्वंस करणे), खाल्ले गेले, भस्म करणारा

व्याख्या:

"नाश करणे" या शब्दाचा शब्दशः अर्थ काहीतरी वापरून संपवणे असा होतो. या शब्दाचे अनेक लाक्षणिक अर्थ आहेत.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "नाश करणे" या शब्दाचा सहसा संदर्भ वस्तूंचा किंवा लोकांचा नाश करण्याशी येतो.
  • एक आग ही वस्तूंचा नाश करते असे म्हंटले जाते, ह्याचा अर्थ त्यांना जाळून त्यांचा नाश करण्यात येतो.
  • देवाचे वर्णन "भस्म करणारा अग्नी" असे केले आहे, हे त्याच्या पापाबद्दलच्या रागाचे वर्णन आहे. जे पापी पश्चात्ताप करत नाहीत, त्याच्याबद्दल त्याच्या क्रोधाचा परिणाम भयंकर शिक्षेत होतो.
  • अन्नाचा नाश करणे म्हणजे, काहीतरी खाणे किंवा पिणे होय.
  • "भूमीचा विध्वंस करा" या वाक्यांशाचे भाषांतर "भूमीचा नाश करा" असे केले जाऊ शकते.

भाषांतर सूचना

  • भूमीचा किंवा लोकांचा नाश करणे ह्याच्या संदर्भात, या शब्दाचे भाषांतर "नाश करणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा अग्नीचा संदर्भ "नाश करणे" असा येतो, तेंव्हा ह्याचे भाषांतर "जाळून टाकणे" असे केले जाऊ शकते.
  • जळणारे झुडूप जे मोशेने बघितले होते, "ते नाश झाले नाही" त्याचे भाषांतर "जळून गेले नाही" किंवा "जळाले नाही" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा खाण्याचा संदर्भ येतो, तेंव्हा "नाश करणे" या शब्दाचे भाषांतर "खाणे" किंवा "गिळणे" असे केले जाऊ शकते.
  • जर एखाद्याच्या ताकदीचा "नाश झाला असेल" तर ह्याचा अर्थ त्याची ताकदीचा "वापर झाला" किंवा "गेली" असा होतो.
  • "देव हा भस्म करणारा अग्नी आहे" या वाक्यांशाचे भाषांतर "देव अग्निसारखा आहे, जो गोष्टी जाळून टाकतो" किंवा "देव पापाविरुद्ध रागावलेला आहे, आणि तो पाप्याला अग्नीप्रमाणे भस्म करतो" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: गिळणे, क्रोध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: