mr_tw/bible/kt/wrath.md

3.1 KiB

क्रोध, प्रकोप

व्याख्या:

क्रोध हा एक तीव्र राग आहे, जो कधीकधी दीर्घकाळ टिकणारा असतो. हे विशेषकरून देवाचे पापाबद्दलचा नितीमत्वाचा निकाल आहे, आणि लोकांची शिक्षा आहे जे त्याच्याविरुद्ध बंडखोरी करतात.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "क्रोध" ह्याचा संदर्भ सहसा देवाच्या रागाशी येतो, जो त्याच्यावर येतो जे त्याच्याविरुद्ध पाप करतात.
  • "देवाचा क्रोध" ह्याचा संदर्भ पापाबद्दल त्याचा निर्णय आणि शिक्षा ह्याच्या संबंधात येतो.
  • देवाचा क्रोध हा अशा लोकांसाठी नितीमत्वक दंड आहे, जे त्यांच्या पापासाठी पश्चात्ताप करीत नाहीत.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "तीव्र राग" किंवा "नितीमत्वक निर्णय" किंवा "राग" ह्यांचा समावेश होतो.
  • जेंव्हा देवाच्या क्रोधाबद्दल बोलले जाते, तेंव्हा या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरला जाणारा शब्द किंवा वाक्यांश पापमय संतापाच्या लायक ह्याचा संदर्भ देत नाही, ह्याची खात्री करा. देवाचा क्रोध हा योग्य आणि पवित्र आहे.

(हे सुद्धा पहा: न्यायाधीश, पाप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: