mr_tw/bible/other/breastplate.md

3.3 KiB

उरस्त्राण, उरस्त्राणे, उरपट

व्याख्या:

"उरस्त्राण" या शब्दाचा अर्थ, युद्धामध्ये सैनिकाला वाचवण्यासाठी त्याच्या छातीच्या पुढच्या भागाला आच्छादून टाकणारा चिलखताचा तुकडा असा होतो. "उरपट" या शब्दाचा संदर्ब, कापडाच्या विशेष तुकड्याशी येतो, ज्याला इस्राएली महायाजक त्यांच्या छातीच्या पुढच्या भागावर घालत असत.

  • एक "उरस्त्राण" ज्याला सैनिक वापरतात, ते लाकूड, धातू, किंवा प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले असू शकते. हे तीर, भाले, आणि तलवार ह्यांनी सैनिकाची छाती छेदण्यापासून रोखण्यासाठी बनवले जाते.
  • "उरपट" ज्याला इस्राएली याजकांकडून घालते जात होते, त्याला कापडापासून बनवण्यात येत होते, आणि त्याला मौल्यवान रत्ने जोडलेली असत. जेंव्हा याजक मंदिरामध्ये, देवाची सेवा करण्याची जबाबदारी निभावत असत, तेंव्हा ते परिधान करत आत.
  • "उरस्त्राण" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "छाती व्यापणारे धातूचे कवच" किंवा "छातीचे संरक्षण करणारा चिलखताचा तुकडा" ह्यांचा समवेश होऊ शकतो.
  • "उरपट" या शब्दाचे भाषांतर, "छाती व्यापणारे याजकीय कापड" किंवा "याजकीय कापडाचा तुकडा" किंवा "याजकीय कपड्याचा पुढचा तुकडा" अशा अर्थाच्या शब्दांनी केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: चिलखत, महायाजक, छेदणे (खुपसणे), याजक, मंदिर, योद्धा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: