mr_tw/bible/other/armor.md

3.1 KiB

शस्त्रे, शस्त्रास्ते (शास्त्रसामग्री)

व्याख्या:

"शस्त्रे" या शब्दाचा संदर्भ युद्धात लढण्यासाठी आणि शत्रुच्या हल्ल्यांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी एक सैनिक वापरणाऱ्या उपकरणांशी आहे. हे लाक्षणिक पद्धतीने आध्यात्मिक शास्त्रांसंदर्भात देखील वापरले जाते.

  • एका सैनिकांच्या शस्त्रांमध्ये टोप, शिरस्त्राण, एक ढाल, छाती, पाय झाकणारे मोजे आणि तलवार यांचा समावेश आहे.
  • या शब्दांचा लाक्षणिकरित्या वापर करून, प्रेषित पौलाने शारीरिक शस्त्रास्त्रांची तुलना आध्यात्मिक शास्त्रांशी केली आहे जे परमेश्वर विश्वासनाऱ्यांना आध्यात्मिक लढायांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी देतो.
  • जी आध्यात्मिक शस्त्रे परमेश्वर त्याच्या लोकांना पापाविरुद्ध आणि सैतानाविरुद्ध लढण्यासाठी देतो त्यामध्ये सत्य, धार्मिकता, शांतीची सुवार्ता, विश्वास, तारण आणि पवित्र आत्मा यांचा समावेश आहे.
  • याला "सैनिकाची साधने" किंवा "युद्धामध्ये वापरण्यासाठी संरक्षणात्मक कपडे" किंवा "संरक्षणात्मक आवरण" किंवा "शस्त्रे" या शब्दांसह भाषांतरित केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: विश्वास, पवित्र आत्मा, शांती, जतन, आत्मा

पवित्र शास्त्रातील संदर्भ: