2.0 KiB
2.0 KiB
सन्हेरीब
तथ्य:
सन्हेरीब हा अश्शूराचा एक शक्तिशाली राजा होता, ज्याने निनवेला एक श्रीमंत, महत्त्वपूर्ण शहर बनवले.
- राजा सन्हेरीब हा त्याच्या बाबेलाच्या आणि यहूदा राज्याच्या विरोधातील युद्धासाठी प्रसिद्ध आहे.
- तो एक अतिशय गर्विष्ठ राजा होता, आणि त्याने यहोवाची थट्टा केली.
- हिज्कीया राजाच्या काळात, सेन्हरीबने यरुशलेमवर हल्ला केला.
- सेन्हरीबच्या सैन्याचा नाश होण्यास यहोवा कारणीभूत झाला.
- जुन्या करारातील राजे आणि इतिहास या पुस्तकांमध्ये सन्हेरीबच्या कारकीर्दीतील काही घटनांविषयीची नोंद आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः अश्शूर, बाबेल, हिज्कीया, यहुदा, थट्टा, निनवे)