mr_tw/bible/names/ramoth.md

2.3 KiB

रामोथ

तथ्य:

यार्देन नदीच्या जवळील, गिलादच्या डोंगराळ प्रदेशातील रामोथ हे महत्वाचे शहर होते. त्याला रामोथ गिलाद असेही म्हंटले जाते.

  • रामोथ हे शहर गाद या इस्राएली कुळाचे होते, आणि त्याला संरक्षक शहर हे म्हणून नियक्त केले होते.
  • इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोथ येथे अरामच्या राजावर हल्ला केला. त्या युद्धामध्ये अहाब मारला गेला.
  • काही काळानंतर, अहज्या राजा आणि योरम राजा ह्यांनी रामोथ हे शहर अरामच्या राजाकडून घेण्याचा प्रयत्न केला.
  • रामोथ गिलाद येथे येहूला इस्राएलावर राजा म्हणून नियुक्त करण्यात आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहाब, अहज्या, अराम, गाद, यहोशाफाट, येहू, योराम, यार्देन नदी, यहूदा, आश्रयस्थान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: