mr_tw/bible/names/luke.md

2.3 KiB

लुक

तथ्य:

लुक ह्याने नवीन करारातील दोन पुस्तके लिहिली: लुक कृत शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये.

  • पौलाने कलस्सैकरांस लिहिलेल्या पत्रात, पौल लुकचा वैद्य असा संदर्भ देतो. पौलाने लुकचा उल्लेख त्याच्या आणखी दोन पत्रामध्ये केला.
  • असे समजले जाते की लुक एक ग्रीक आणि विदेशी मनुष्य होता, जो ख्रिस्ताचा विश्वासी बनला होता. त्याच्या शुभवर्तमानामध्ये, लुक अनेक वृतान्ताचा समावेश करतो, ज्यात येशूचे सर्व लोकांच्याबद्दलचे प्रेम, यहुदी आणि परराष्ट्रीय दोन्हीसाठी ठळक होते.
  • लुकने पौलाला त्याच्या सुवार्ताप्रसाराच्या दोन यात्रेमध्ये सोबत दिली आणि त्याच्या कामामध्ये त्याला मदत केली.
  • काही आद्य मंडळींच्या लिखाणामध्ये, असे म्हंटले जाते की, लुक सुरीयातील अंत्युखिया या शहरात जन्माला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अंत्युखिया, पौल, सुरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: