mr_tw/bible/names/paul.md

6.2 KiB

पौल, शौल

तथ्यः

पौल हा सुरुवातीच्या मंडळीचा पुढारी होता, ज्यास येशूने इतर अनेक लोकसमूहात सुवार्ता सांगण्यासाठी पाठवले होते.

  • पौल एक यहूदी होता जो रोमन शहरातील तार्सस शहरात जन्मला होता आणि म्हणूनच तो रोमी नागरिक होता.
  • पौलाला त्याच्या मूळ यहूदी नावानेच शौल म्हटले गेले.
  • शौल यहुदी धार्मिक पुढारी झाला आणि ख्रिस्ती बनलेल्या यहुदींना त्यांनी अटक केली कारण त्याला वाटले की येशूवर विश्वास ठेवून ते देवाचा अनादर करीत आहेत.
  • येशूने शौलाला अंधुक प्रकाशात प्रगट केले आणि ख्रिश्चनांना त्रास देणे थांबवण्यास सांगितले.
  • शौलने येशूवर विश्वास ठेवला आणि त्याच्याविषयी त्याच्या इतर यहुदी लोकांना शिकवायला सुरुवात केली.
  • नंतर, देवाने शौलाला यहूदी नसलेल्या लोकांना येशूविषयी शिकवण्यासाठी पाठविले आणि रोमी साम्राज्याच्या वेगवेगळ्या शहरे व प्रांतांमध्ये चर्च सुरू केले. यावेळी त्याला “पौल” नावाच्या रोमन नावानेच ओळखले जाऊ लागले.
  • या शहरांमधील चर्चमधील ख्रिस्ती लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी पौलाने पत्रेही लिहिली. यातील कित्येक पत्रे नवीन करारामध्ये आहेत

(भाषांतर सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे]

(हे देखील पहा: [ख्रिश्चन], [यहूदी पुढारी, [रोम]]

बायबल संदर्भ:

  • [१ करिंथकर 01:03]
  • [कृत्ये 08:03]
  • [कृत्ये 09:26]
  • [प्रेषितांची कृत्ये 13:10]
  • [गलतीकर 01:01]
  • [फिलेमोन 01:08]

बायबलमधील कथांमधील उदाहरणे:

  • __ [45:06] __शौल नावाच्या तरूणाने स्तेफनला ठार मारलेल्या आणि त्याच्यावर दगडफेक करत असताना त्यांच्या वस्त्राचे रक्षण करणाऱ्या लोकांशी सहमती दर्शविली.
  • __ [46:01] शौल_ हा स्तेफनला ठार मारणाऱ्या लोंकाच्या कपड्यांचा पहारा करणारा तरुण होता. तो येशूवर विश्वास ठेवत नव्हता, म्हणून त्याने विश्वासणाऱ्यांचा छळ केला.
  • __ [46:01] __शौल दिमीष्कच्या मार्गावर जात असताना आकाशातून एक चमकणारा प्रकाश त्याच्या सभोवताली चमकला आणि तो जमिनीवर पडला. कोणीतरी असे म्हणत आहे हे त्याने ऐकले, “__शौला__शौला तु माझा छळ का केला? ”
  • __ [46:05]__ म्हणून हनन्या शौला कडे गेला आणि त्याच्यावर आपले हात ठेवले आणि म्हणाला, "येशू, जो या मार्गाने येथे तुला दिसला, त्याने मला तुझ्याकडे पाठविले आहे म्हणजे पुन्हा तुला दृष्टी यावी व तू पवीत्र आत्म्याने भरावे लगेच शौलाला पुन्हा दृष्टी आली आणि हनन्याने त्याला बातिस्मा दिला.
  • [46:06] लगेचच शौलाने दिमीष्कातील यहुद्यांना प्रचार करण्यास सुरुवात केली की, “येशू हा देवाचा पुत्र आहे!”
  • __[46:09] बर्नबा आणि __शौल या नव्या विश्वासणाऱ्यांना येशूविषयी आणि मंडळीला बळकट करण्यासाठी शिकवण्यासाठी तेथे गेले (अन्तूखीयाला).
  • __[47:01]__शौल संपूर्ण रोमन साम्राज्यात फिरत असताना, त्याने त्याचे रोमन नाव “पौल” वापरायला सुरुवात केली.
  • __[47:14] __पौल आणि इतर ख्रिस्ती पुढारी, येशूविषयीची सुवार्ता लोकांना शिकवत आणि सुर्वाता सांगत अनेक शहरांमध्ये फिरले.

शब्द डेटा:

  • मजबूत: G3972, G4569