2.6 KiB
2.6 KiB
किद्रोन खोरे
तथ्य:
किद्रोन खोरे हे एक खोल दरी आहे, जी यरुशलेम शहराच्या बाहेर, पूर्वेकडील भिंत आणि जैतुनाचा डोंगर ह्यांच्या मध्ये आहे.
- हे खोरे सुमारे 1000 मीटर खोल आणि 32 किलोमीटर लांब आहे.
- जेंव्हा दावीद राजा, त्याचा मुलगा अबशालोम ह्यापासून पळून गेला, तेंव्हा तो जैतुनाच्या डोंगरावर जाण्यासाठी, किद्रोन खोऱ्यामधून गेला.
- यहुद्यांचा राजा योशीया आणि असा राजा ह्यांनी आज्ञा दिली की, खोट्या देवतांचे उच्च स्थाने आणि वेद्या ह्यांचा नाश करून त्या जाळून टाका आणि त्यांची राख किद्रोन खोऱ्यात नेऊन टाका.
- हिज्कीया राजाच्या कारकिर्दीत, याजकांनी मंदिरामधून काढलेल्या सर्व अशुद्ध वस्तूंना किद्रोनच्या खोऱ्यात फ्हेकून देण्यात आले.
- दुष्ट राणी अथल्या हिला, तिने केलेल्या वाईट कृत्यांमुळे किद्रोन खोऱ्यात मारण्यात आले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अबशालोम, असा, अथल्या, दावीद, खोटे देव, हिज्कीया, उच्च स्थाने, योशीया, यहूदा, जैतुनाचा डोंगर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H5674, H6939, G2748, G5493