mr_tw/bible/names/judasiscariot.md

4.6 KiB
Raw Permalink Blame History

यहूदा इस्कार्योत

तथ्य:

यहूदा इस्कार्योत हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता. हा तोच होता ज्याने यहुदी पुढाऱ्यांसाठी येशूचा विश्वासघात केला.

  • "इस्कार्योत" या नावाचा अर्थ "करीयोथ येथून" असा होऊ शकतो, कदाचित यहूदा त्या शहरात वाढला असे सूचित करतो.
  • यहूदा इस्कार्योताने प्रेषितांच्या पैशाचे व्यवस्थापन केले व नियमितपणे स्वत:साठी वापरण्याकरता त्यापैकी काही चोरले.
  • धार्मिक पुढाऱ्यांना, त्यांना येशूला अटक करता यावी म्हणून तो कुठे होता हे सांगून यहुदाने येशूचा विश्वासघात केला.
  • धार्मिक नेत्यांनी येशूला जीवे मारण्यासाठी दोषी ठरवल्यानंतर, यहुदाने येशूचा विश्वासघात केला म्हणून त्याने पश्चात्ताप केला, म्हणून त्याने विश्वासघाताचा पैसा यहुदी पुढाऱ्यांना परत केला आणि नंतर आत्महत्या केली.
  • अजून एक प्रेषित ज्याचे देखील नाव यहूदा होते, तो येशुंच्या भावांपैकी एक होता. येशूचा भाऊ याला "यहूदा" म्हणूनसुद्धा ओळखले जाते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: प्रेषित, विश्वासघात, यहुदी पुढारी, याकोबाचा मुलगा यहूदा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 38:02 येशू आणि शिष्य यरुशलेममध्ये आल्यानंतर, यहूदा धार्मिक पुढा-यांना जाऊन भेटतो व पैशांच्या मोबदल्यात येशूला पकडून देण्याविषयी बोलतो.

  • 38:03 तेंव्हा महायाजक व यहूदी पुढा-यांनी मिळून, येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीची तीस नाणी दिले.

  • 38:14 यहूदा धार्मिक पुढारी, सैनिक व एका मोठया लोकसमुदायाबरोबर आला. * यहूदा येशूजवळ येऊन म्हणाला, ‘‘सलाम, गुरुजी, आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.

  • 39:08 दरम्यान, येशूस धरुन देणा-या यहूदाने पाहिले की, यहूदी धर्मपुढा-यांनी येशूला मरणदंडाची शिक्षा दिली आहे. तेंव्हा यहूदास असे केल्याचा पस्तावा झाला व त्याने जाऊन आत्महत्या केली.

  • Strong's: G2455, G2469