mr_tw/bible/other/betray.md

5.7 KiB
Raw Permalink Blame History

धरून देणे (विश्वासघात करणे), दुःख देणे, धरून दिले (विश्वासघात केला), धरून देऊन, धरून देणारा, विश्वासघातकी

व्याख्या:

"विश्वासघात" या शब्दाचा अर्थ म्हणजे एखाद्याला फसविणे आणि त्याला हानी पोहोचवणे. "विश्वासघातकी" एक असा मनुष्य आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मित्राचा विश्वासघात करतो.

  • यहूदा "विश्वासघातकी" होता, कारण त्याने यहुदी पुढाऱ्यांना येशूला कसे पकडता येईल हे सांगितले.
  • यहुदाचा विश्वासघात विशेषतः दुष्ट होता, कारण तो येशूचा प्रेषित होता, ज्याने यहूदी पुढाऱ्यांना येशूची माहिती देण्याकरता पैसे प्राप्त केले, ज्याचा परिणाम येशूचा अन्यायकारक मृत्यू असा झाला.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "विश्वासघात" या शब्दाचे भाषांतर "फसवणे आणि हानीस कारणीभूत होणे" किंवा "शत्रूकडे वळणे" किंवा "विश्वासघातकी पणाने वागणे" असे केले जाऊ शकते.
  • "विश्वासघातकी" या शब्दाचे भाषांतर "असा मनुष्य जो विश्वासघात करतो" किंवा "दुहेरी व्यापारी" किंवा "स्वपक्षद्रोही" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: यहूदा इस्कीर्योत, यहुदी पुढारी, प्रेषित)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 21:11 इतर संदेष्टयांनी अगोदरच सांगून ठेवले की मसीहास मारणारे लोक त्याचे कपडे वाटून घेण्यासाठी चिठ्टया टाकतील आणि मसीहाचा एक मित्रच त्याचा विश्वासघात करिल. जख-या संदेष्टयाने अगोदरच सांगून ठेवले होते की मसिहाचा विश्वासघात करण्यासाठी त्याच्या मित्रास वेतन म्हणून चांदीची तीस नाणी दिली जातील.

  • 38:02 येशू आणि शिष्य यरुशलेममध्ये आल्यानंतर, यहूदा धार्मिक पुढा-यांना जाऊन भेटतो व पैशांच्या मोबदल्यात येशूला पकडून देण्याविषयी बोलतो.

  • 38:03 तेंव्हा महायाजक व यहूदी पुढा-यांनी मिळून, येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीची तीस नाणी दिले.

  • 38:06 मग येशू शिष्यांना म्हणाला, ‘‘तुम्हापैकी एक माझा विश्वासघात करील.

  • 38:13 जेंव्हा तो तिस-यांदा परतला तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘उठा! माझा विश्वासघात करणारे आला आहे.

  • 38:14 तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘यहूदा, माझे चुंबन घेऊन माझा विश्वासघात करीत आहेस काय?

  • 39:08 दरम्यान, येशूस धरुन देणा-या यहूदाने पाहिले की, यहूदी धर्मपुढा-यांनी येशूला मरणदंडाची शिक्षा दिली आहे. तेंव्हा यहूदास असे केल्याचा पस्तावा झाला व त्याने जाऊन आत्महत्या केली.

  • Strong's: H7411, G3860, G4273