mr_tw/bible/names/judassonofjames.md

2.3 KiB

याकोबाचा मुलगा यहूदा

तथ्य:

याकोबाचा मुलगा यहूदा हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता. हा व्यक्ती यहूदा इस्कर्योत नाही ह्याची नोंद घ्या.

  • पवित्र शास्त्रामध्ये, बऱ्याचदा एकाच नावाच्या मनुष्यांना, ते कोणाचे मुलगे आहेत, ह्याचा उल्लेख करून वेगळे केले जात होते. इथे यहूदाला "याकोबाचा मुलगा" असे ओळखले जाते.
  • अजून एक यहूदा नावाचा मनुष्य येशूचा भाऊ होता. त्याला "यहूदा" म्हणूनसुद्धा ओळखले जाते.
  • नवीन करारातील पुस्तक "यहूदा" हे कदाचित येशूचा भाऊ यहूदा ह्याने लिहिले असावे, कारण लेखक स्वतःची ओळख "याकोबाचा भाऊ" अशी करून देतो. याकोब हा येशूचा अजून एक भाऊ होता.
  • हे सुद्धा शक्य आहे की, यहूदा हे पुस्तक येशूचा शिष्य यहूदा, याकोबाचा मुलगा, ह्याने लिहिले असावे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे देखील पहा: याकोब (जब्दीचा मुलगा), यहूदा इस्कर्योत, पुत्र, बारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: