mr_tw/bible/names/jeroboam.md

4.8 KiB

यराबाम

तथ्य:

सुमारे 900-910 इ.स.पू. मध्ये नबाटाचा मुलगा यराबाम हा उत्तरेकडील इस्राएलाच्या राज्याचा पहिला राजा होता. आणखी एक यराबाम, जो योशीयाचा मुलगा होता, त्याने 120 वर्षानंतर इस्राएलावर राज्य केले.

  • शलमोनानंतर नाबाटाचा मुलगा यराबाम राजा बनेल आणि तो इस्राएलाच्या दहा कुळांवर राज्य करेल अशी भविष्यवाणी यहोवाने दिली.
  • जेंव्हा शलमोन मेला, तेंव्हा इस्राएलाच्या उत्तरेकडील दहा कुळांनी शलमोनाचा मुलगा रह्बाम ह्याच्या विरुद्ध बंड केले आणि त्याच्या जागी यराबाम ह्याला राजा केले आणि रहाबाम याला दक्षीणेकडील दोन कुळांवर यहूदा आणि बन्यामीन ह्यांच्यावर राजा म्हणून ठेवले.
  • यराबाम हा एक दुष्ट राजा होता, त्याने त्याच्या लोकांना यहोवाची उपासना करण्यापासून दूर नेले आणि त्याऐवजी उपासना करण्यासाठी त्यांच्यापुढे मूर्तींना उभे केले. इस्राएलाच्या इतर राजांनी सुद्धा यराबामचे अनुसरण केले आणि ते सुद्धा त्याच्यासारखेच दुष्ट होते.
  • जवळजवळ 120 वर्षांनंतर, आणखी एक राजा यराबाम, हा उत्तरेकडील इस्राएल राष्ट्रावर राज्य करू लागला. हा यराबाम हा योशीया राजाचा मुलगा होता आणि तो सुद्धा आधी होऊन गेलेल्या इस्राएलाच्या राजांसारखाच दुष्ट होता.
  • इस्राएलाच्या दुष्टाईनंतरही, देवाने त्यांच्यावर दया केली आणि या यराबामला जमीन मिळवण्यासाठी आणि त्याच्या क्षेत्रासाठी सीमा स्थापन करण्यासाठी त्याला देवाने मदत केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: खोटे देव, इस्राएलाचे राज्य, यहूदा, शलमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 18:08 इस्राएल राष्ट्राच्या अन्य दहा बंडखोर गोत्रांनी यरुबाम नावाच्या मनुष्यास आपला राजा म्हणून नेमले.

  • 18:09 यराबामाने देवाविरुध्द बंड पुकारले व लोकांना पापात पाडिले. यहूदाच्या राज्यामध्ये असलेल्या देवाच्या मंदिरात उपासना न करता त्याने आपल्या लोकांसाठी दोन मूर्ति स्थापन केल्या व त्यांची पूजा करु लागल्या.

  • Strong's: H3379