2.2 KiB
2.2 KiB
याकोब (येशूचा भाऊ)
तथ्य:
-
याकोब हा मरिया आणि योसेफाचा मुलगा होता. तो येशूचा लहान अर्धा भाऊ होता.
-
येशूचे इतर अर्ध्या भावांची नावे योसेफ, यहूदा आणि शिमोन अशी होती.
-
येशूच्या जीवनकाळात, याकोब आणि त्याच्या भावांनी येशू हाच मसिहा आहे यावर विश्वास ठेवला नाही.
-
नंतर, येशू मरणातून जिवंत उठल्यानंतर, याकोबाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि यरुशलेममधील एका मंडळीचा पुढारी बनला.
-
नवीन करारातील याकोबाचे पुस्तक, हे याकोबाने अशा ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे, जे लोक छळापासून वाचण्यासाठी इतर देशात पळून गेले होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: प्रेषित, मंडळी, याकोबाचा मुलगा यहूदा, छळ)