mr_tw/bible/names/bashan.md

2.4 KiB

बाशान

तथ्य:

बाशान नावाचा जमिनीचा एक प्रांत होता जो गालील समुद्राच्या पूर्वेस होता. त्यां व्यापलेल्या भागात आताचे सिरीया आणि गोलानच्या उंच रांगा आहेत.

  • जुन्या करारामधील अश्रयांचे नगर ज्याचे नाव "गोलान" होते, ते बाशानाच्या प्रांतात स्थित होते.
  • बाशान हा एक खूप सुपीक प्रदेश होता जो त्याच्यात असणाऱ्या ओकच्या झाडांसाठी आणि कुरणात चारणाऱ्या प्राणी (गाय किंवा मेंढ्या) यासाठी ओळखला जात होता.
  • उत्पत्ति 14 मध्ये नमूद करण्यात आले आहे की बाशान हे अनेक राजे व त्यांच्या राष्ट्रांदरम्यानच्या युद्धाचे ठिकाण होते.
  • मिसरमधून बाहेर पडल्यावर इस्राएलांच्या वाळवंटातील भटकंती दरम्यान, त्यांनी बाशान प्रदेशाचा भाग ताब्यात घेतला.
  • काही वर्षानंतर, शलमोन राजाने त्या प्रांतातून पुरवठा मिळवला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, ओक, गलील समुद्र, सीरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: