mr_tw/bible/other/oak.md

2.7 KiB

एलोन, अल्लोन

व्याख्या:

एलोन किंवा एलोनाचे झाड, हे उंच सावलीचे, मोठ्या बुंध्यासहित आणि दूरवर पसरलेल्या फांद्यांचे झाड आहे.

एलोनच्या झाडाचे लाकूड मजबूत, आणि कठीण असते, ज्याचा उपयोग जहाज बांधण्यासाठी आणि शेतीचे नांगर, बैलांचे जोखड आणि चालण्याच्या काठ्या बनवण्यासाठी केला जात होता.

  • एलोनच्या झाडाच्या फळाला ओकफळ असे म्हंटले जाते.
  • एलोनच्या ठराविक झाडांचे बुंधे सुमारे 6 मीटर पर्यंत मोजले जाऊ शकतात.
  • एलोनचे झाड दीर्घायुष्याचे प्रतिक आहे आणि त्याचे इतर आत्मिक अर्थ आहेत. पवित्र शास्त्रामध्ये, त्यांचा संबंध सहसा पवित्र स्थानाशी आला.

भाषांतर सूचना

  • "एलोन" या शब्दाऐवजी "एलोनचे झाड" या शब्दाचा वापर करणे, बऱ्याच भाषांतरांना महत्त्वपूर्ण वाटले.
  • जर एलोनचे झाड ग्रहणीय क्षेत्रामध्ये माहित नसेल तर, "एलोन" ह्याचे भाषांतर "एलोन, जे एका मोठ्या सावलीच्या झाडासारखे....," आणि नंतर समान वैशिष्ठे असलेल्या स्थानिक झाडाचे नाव द्या.
  • (पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहाः पवित्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: