2.8 KiB
2.8 KiB
अजऱ्या
तथ्य:
जुन्या करारांमध्ये अजऱ्या नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
- एक अजऱ्याला त्याच्या बाबेलमधील नावाने म्हणजेच अबेदनगो या नावाने चांगले ओळखले जाते. तो यहूदातील बऱ्याच इस्राएलांपैकी एक होता. ज्यांना नबुखदनेस्सरच्या सैन्याने पकडले आणि बाबेलमध्ये राहायला नेले. अजऱ्या व त्याचे सहकारी इस्राएली हनन्या व मीशाएल यांनी बाबेलच्या राजाची उपासना करण्यास नकार दिला, म्हणून त्याने त्यांना एका भयानक धगधगणाऱ्या भट्टीत दंड म्हणून फेकून दिले. परंतु परमेश्वराने त्यांना वाचवले आणि त्यांना काहीही इजा झाली नाही.
- यहूदाचा राजा उज्जीया सुद्धा "अजऱ्या" म्हणून ओळखण्यात आले.
- दुसरा अजऱ्या हा जुन्या करारामध्ये महायाजक होता.
- संदेष्टा यिर्मया याच्या काळात अजऱ्या नावाच्या एका मनुष्याने इस्राएली लोकांना त्यांची जन्मभूमी सोडुन, देवाची आज्ञा मोडण्यास चुकीने उद्युक्त केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हेही पाहा: बाबेल, दानीएल, हनन्या, मिशाएल, यिर्मया, उज्जीया)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H5838