Door43-Catalog_mr_tn/ACT/08/01.md

2.6 KiB

शौल सहमत होता

लूक त्याची कथा स्तेफनापासून शौलकडे बदलतो. तुमच्या भाषेत दोन प्रमुख कलाकारांच्यामध्ये कथेचे कसे स्थलांतर होते हे तुम्हांला समजणे कदाचित आवश्यक आहे.

बाहेर खेचणे

त्यांना जबरदस्तीने घेऊन जात होते

त्या दिवशी

ज्या दिवशी स्तेफन मेला होता त्या दिवशी

विश्वासणाऱ्याची पांगापांग झाली

यरूशलेमेमध्ये राहाणारे अनेक किंवा बहुतांश विश्वासणारे छळामुळे पळून गेले ह्या विषयीचा हा अतिशयोक्ती अलंकार आहे. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

प्रेषितांखेरीज

प्रेषित यरूशलेमेमध्येच राहिले होते व त्यांना त्या मोठ्या छळाचा अनुभव आला नव्हता हे सूचित होते (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट माहीती)

धर्माभिमान पुरुष

"देवभीरू पुरुष" किंवा "देवाचे भय धरणारे पुरुष"

फार शोक केला

"त्याच्यासाठी फार मोठ शोक केला" (UDB)

तो घरोघरी गेला

शौल अनेक घरांत प्रवेश करीत होता ह्याची ही अतिशयोक्ती आहे. यरूशले मेमधील प्रत्येक घरांत जाण्याचा त्याला अधिकार नव्हता (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

पुरुष आणि स्त्रियांना खेचून आणीत होता

शौल यहूदी विश्वासणाऱ्यांना जबरदस्तीने त्यांच्या घरांतून बाहेर खेचून काढून त्यांना तुरुंगांत टाकीत होता.