mr_tn/MAT/13/15.md

2.2 KiB

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो. १३:१४ मधील यशयाच्या शब्दांची तो पुनरावृत्ती करण्याचे चालू ठेवतो.

लोकांचे अंत:करण जड झाले आहे

"हे लोक यापुढे कधीच शिकू शकणारच नाहीत" (पाहा यु डी बी ).

ते कानांनी मंद ऐकतात

"त्यांना यापुढे ऐकण्याची इच्छा नाही" (पाहा यु डी बी ).

त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत

"त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत" किंवा "त्यांनी बघण्याचे नाकारले आहे"

कदाचित त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये, आपल्या कानांनी ऐकू नये, आपल्या अंत:करणाने समजू नये, आणि परत वळू नये

"आणि म्हणून ते आपल्या डोळ्यांनी पाहू शकणार नाहीत, त्यांच्या कानांनी ऐकणार नाहीत, त्यांच्या अंत:करणाने समजणार नाहीत, आणि परिणामत: वळणार नाहीत."

परत वळणे

"मागे फिरणे" किंवा "पश्चात्ताप करणे"

आणि मी त्यांना बरे करावे

"त्यांना बरे करणे मला भाग पडावे." पर्यायी भाषांतर: "आणि मी त्यांना परत स्वीकारावे." (पाहा: रूपक)