येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो. १३:१४ मधील यशयाच्या शब्दांची तो पुनरावृत्ती करण्याचे चालू ठेवतो. # लोकांचे अंत:करण जड झाले आहे "हे लोक यापुढे कधीच शिकू शकणारच नाहीत" (पाहा यु डी बी ). # ते कानांनी मंद ऐकतात "त्यांना यापुढे ऐकण्याची इच्छा नाही" (पाहा यु डी बी ). # त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत "त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत" किंवा "त्यांनी बघण्याचे नाकारले आहे" # कदाचित त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये, आपल्या कानांनी ऐकू नये, आपल्या अंत:करणाने समजू नये, आणि परत वळू नये "आणि म्हणून ते आपल्या डोळ्यांनी पाहू शकणार नाहीत, त्यांच्या कानांनी ऐकणार नाहीत, त्यांच्या अंत:करणाने समजणार नाहीत, आणि परिणामत: वळणार नाहीत." # परत वळणे "मागे फिरणे" किंवा "पश्चात्ताप करणे" # आणि मी त्यांना बरे करावे "त्यांना बरे करणे मला भाग पडावे." पर्यायी भाषांतर: "आणि मी त्यांना परत स्वीकारावे." (पाहा: रूपक)