mr_tn/LUK/02/04.md

2.3 KiB
Raw Blame History

यहुदीयातील बेथलेहेम गावी प्रवास करून गेला

ह्याचे भाषांतर ‘’यहुदीयातील बेथलेहेम गावी गेला. नासरेथ पेक्षा बेथलेहेम गाव अधिक जास्त उंचीवर होते.

दाविदाचे घराणे

त्याच्या महत्वामुळे , आकारामुळे नाही , बेथलेहेमाला गाव म्हंटले आहे. दाविदाचा तिकडे जन्म झाला आणि एक भविष्यवाणी होती की मसिहाचा जन्म तिकडेच होईल. ‘’दाविदाचे घराणे’’ ह्याचे भाषांतर ‘’दावीद राजाचे घराणे ‘’असे करता येते.

नाव लिहून घेण्यासाठी

ह्याचे भाषांतर ‘’त्याचे नाव त्या वहीत लिहून घेण्यासाठी’’ किंवा ‘’त्या मोजणीत स्वतःला समाविष्ट करून घेण्यासाठी.

मरीयेबरोबर

नासरेथ मधून योसेफाच्या बरोबर मरीयेने प्रवास केला. स्त्रियांना देखील कदाचित कर द्यावा लागत होता म्हणून, तिने प्रवास करून स्वतःचे नाव नोंदून घ्यायचे होते.

त्याला वाग्दत झालेली

ह्याचे भाषांतर वचनबद्ध वधू किंवा ‘’जिला त्याला देण्याचे वचन दिले होते. एक वाग्दत दांपत्याला कायदेशीर रीतीने विवाहित असे लेखले जात होते, पण त्यांच्यात शारीरिक संबंध नसावेत.