mr_tn/1CO/06/09.md

30 lines
2.5 KiB
Markdown

# .हे तुम्हांला ठाऊक नाही काय?
त्यांना या सत्याबद्दल अगोदरच माहीत असावे यावर तो जोर देत आहे. AT:"तुम्हांला अगोदरच हे ठाऊक आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# देवाच्या राज्याचे वतन
न्यायाच्या दिवशी नीतिमान म्हणून देव त्यांचा न्याय करणार नाही आणि ते सार्वकालिक जीवनांत प्रवेश करणार नाहीत.
# पुरुष संभोगी
हा पुरुष स्वत:ला संभोगासाठी दुसऱ्याच्या हवाली करतो, असल्या संभोगासाठी तो पैसे न घेणाराही असू शकतो .
# समलिंग संभोगी
पुरुष जे दुसऱ्या पुरुषांशी संभोग करतात.
# चोर
"जो दुसऱ्याच्या वस्तूंची चोरी करतो" किंवा "लुटारू"
# लोभी
AT: "दुसऱ्याना पुरेसे मिळू नये म्हणून स्वत:साठी अधिक घेणारे"
# वित्त हरण करणारे
AT: "फसवणारे" किंवा "जे त्यांच्यार विश्वास ठेवतात त्यांचीच चोरी करणारे" (UDB)
# तुम्ही धुतलेले आहां
देवाने तुम्हांला शुध्द केले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# तुम्ही पवित्र केलेले आहां
देवाने तुम्हांला पवित्र केले आहे किंवा वेगळे केले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# देवाबरोबर तुम्हांला नीतिमान ठरविले आहे
देवाने त्याच्याबरोबर तुम्हांला नीतिमान ठरविले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)