2.5 KiB
2.5 KiB
कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला
‘’एकदाच’’ हा वाक्यांश म्हणजे काहीतरी पिर्णपणे संपवून टाकणे. ह्याचा पूर्ण अर्थ उघड करता येतो: ‘’कारण जेव्हा तो मरण पावला त्याने पापाचे दास्य पूर्णपणे तोडून टाकले’’ (पहा: शब्दप्रयोग आणि उघड व पूर्ण माहिती)
म्हणून तुम्हीही तसे माना: विचार करा
‘’तशाच रीतीने, विचार करा’’ किंवा ‘’ह्याच कारणासाठी तसे माना’’
तुम्हीही तसे माना
‘’तसा विचार करा’’ किंवा ‘’तसे स्वतःला पहा’’
पापाला मेलेले
येथे ‘’पाप’’ म्हणजे जे सामर्थ्य आपल्यात राहते आणि आपल्याला पाप करण्यास भाग पडते. ह्याचे भाषांतर ‘’पापाच्या दास्याला मरण पावणे.’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार)
एकीकडे पापाला मेलेले, पण दुसरीकडे देवाला जिवंत झालेले असे माना
‘’एकीकडे’’ आणि ‘’दुसरीकडे’’ हे वाक्यांश एकाच गोष्टीवर विचार करण्याच्या दोन पद्धती स्पष्ट करतात. पर्यायी भाषांतर: ‘’पापाला मेलेले पण देवाच्या प्रीत्यर्थ जिवंत.’’
ख्रिस्त येशुमध्ये देवाच्या प्रीत्यर्थ जिवंत
पर्यायी भाषांतर: ‘’येशू ख्रिस्त जे सामर्थ्य देतो त्याच्या योगे देवाचे आज्ञापालन करण्यास जगणे’’