mr_tw/bible/other/sex.md

4.5 KiB

संबंध असणे, प्रेमसंबंध, सह झोपणे, सह झोपला, सोबत झोपणे

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, या संज्ञा अप्रिय गोष्टीला सौम्य शब्दात सांगतात, ज्याचा संदर्भ लैंगिक समागमाशी येतो. (पहा: युफेमिसम (अप्रिय गोष्ट सौम्य भाषेत सांगणे, शोभनभाषित)

  • एखाद्या "सोबत झोपणे" या अभिव्यक्तीचा संदर्भ त्या व्यक्तीशी लैंगिक संबंध असल्याचे सूचित करतो. ह्याचा भूतकाळ "सोबत झोपला" असा होतो.
  • जुन्या करारातील पुस्तक, "गीतरत्न" ह्यामध्ये ULB हे "प्रेम" या शब्दाचे भाषांतर करताना "प्रेमसंबंध" या शब्दाचा उपयोग करतात, जे या संदर्भात लैंगिक संबंधाचा उल्लेख करतात. हा शब्द "ला प्रेम करणे" या अभिव्यक्तीशी संबंधित आहे.

भाषांतर सूचना

  • काही भाषा या शब्दाच्या वेगवेगळ्या संदर्भासाठी वेगवेगळ्या अभिव्यक्तींचा उपयोग करू शकतात, त्यामध्ये जिथे जिथे विवाहित जोडप्याचा समावेश आहे किंवा तिथे इतर काही संबंधांचा समावेश आहे, हे ह्यावर अवलंबून आहे. या शब्दाच्या भाषांतराचा प्रत्येक संदर्भामध्ये योग्य अर्थ असल्याची खात्री करणे महत्वाचे आहे.
  • संदर्भावर आधारित, "सोबत झोपणे" ह्याचे भाषांतर "सोबत निजणे" किंवा "ला प्रेम करणे" किंवा "च्या बरोबर समागम करणे" ह्यासारख्या अभिव्यक्तींचा उपयोग करून केले जाऊ शकते.
  • "च्या बरोबर संबंध असणे" ह्याचे भाषांतर करण्याचे इतर पद्धतींमध्ये "च्या बरोबर लैंगिक संबंध असणे" किंवा "च्या बरोबर विवाहित नातेसंबंध असणे" असे केले जाऊ शकते.
  • "प्रेमसंबंध" या शब्दाचे भाषांतर "प्रेमळ" किंवा "सलगी करणे" असेही केले जाऊ शकते. किंवा प्रकल्पित भाषेमध्ये ह्याचे भाषांतर करण्यासाठी स्वाभाविक पद्धतीची अभिव्यक्ती असू शकते.
  • या संकल्पनाचे भाषांतर करण्यासाठी वापरले जाणारे शब्द बायबलचे भाषांतर वापरणाऱ्यांसाठी मान्य आहेत हे तपासणे महत्त्वाचे आहे.

(हे सुद्धा पहा: लैंगिक अनैतिकता)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H160, H935, H1540, H2181, H2233, H3045, H3212, H6172, H7250, H7901, H7903, G1097