mr_tw/bible/other/fornication.md

4.6 KiB

अनैतिक कृत्ये (लैंगिक अनैतिकता), अनैतिक आचरण, अनैतिक, जारकर्म

व्याख्या:

"लैंगिक अनैतिकता" या शब्दाचा संदर्भ लैंगिक कृत्यांविषयी आहे, जो पुरुष आणि स्त्रीच्या विवाहाच्या बाहेरच्या संबंधात येतो. हे देवाच्या योजनेच्या विरुद्ध आहे. पवित्र शास्त्राच्या जुन्या इंग्रजी आवृत्त्यांमध्ये ह्याला "जारकर्म" असे म्हंटले आहे.

  • या शब्दाचा संदर्भ देवाच्या इच्छेच्या विरुद्ध असलेल्या कोणत्याही प्रकारच्या लैंगिक कृत्यांशी आहे, ज्यामध्ये समलैंगिकता आणि अश्लील साहित्यांचा समावेश होतो.
  • व्यभिचार ही एक प्रकारची लैंगिक अनैतिकता आहे, जे विशेषकरून एक विवाहित पुरुष आणि दुसरी व्यक्ती जी त्या व्यक्तीची पत्नी नाही अशा दोघांमधील एक लैंगिक कृत्य आहे.
  • वेश्याव्यवसाय ही दुसऱ्या प्रकारची लैंगिक अनैतिकता आहे, ज्यामध्ये एखाद्याबरोबर समागम करण्यासाठी पैसे देण्याचा समावेश आहे.
  • या शब्दाच्या अर्थाचा उपयोग लाक्षणिकरित्या जेंव्हा ते खोट्या देवांची उपासना करतात तेंव्हा, इस्राएलाचा देवाशी असणाऱ्या अविश्वासूपणाच्या संदर्भात आहे.

भाषांतर सूचना

  • "लैंगिक अनैतिकता" या शब्दाचे भाषांतर "अनैतिकता" असे केले जाऊ शकते, जोपर्यंत या शब्दाचा अचूक अर्थ समजला जातो.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "चुकीची लैंगिक कृत्ये" किंवा "विवाहबाह्य समागम" यांचा समावेश होतो.
  • या शब्दाचे भाषांतर "व्यभिचार" या शब्दाच्या भाषांतरापासून वेगळे असावे.
  • या शब्दांच्या लाक्षणिक उपयोगाच्या भाषांतरामध्ये, शक्य असल्यास शब्दशः शब्दांचे जतन करणे आवश्यक आहे, कारण पवित्र शास्त्रामध्ये देवाशी अविश्वास आणि लैंगिक संबंधात अविश्वास ह्यांच्या मध्ये समान्य तुलना केलेली आहे.

(हे सुद्धा पहा: व्यभिचार, खोटे देव, वेश्या, विश्वासू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2181, H8457, G1608, G4202, G4203