3.8 KiB
3.8 KiB
रोम, रोमी
तथ्य:
नवीन कराराच्या काळात, रोम हे शहर रोमी साम्राज्याचे केंद्र होते. आता ते सध्याचा आधुनिक देश इटलीची राजधानी आहे.
- रोमी सम्राट, इस्राएलासाहित, भूमध्य सागराच्या भोवतालच्या सर्व प्रदेशांवर शासन करत होता.
- "रोमी" या शब्दाचा संदर्भ त्या क्षेत्राशी संबंधित असलेले काहीही जे रोमी शासनाच्या नियंत्रणामध्ये आहे ह्याच्याशी आहे, त्यामध्ये रोमी नागरिक आणि रोमी अधिकारी ह्यांचा समावेश आहे.
- प्रेषित पौलाला कैदी म्हणून रोम शहरात नेण्यात आले, कारण त्याने येशुबद्दलच्या सुवार्तेचा प्रचार केला होता.
- नवीन करारातील रोमकरांस पत्र, हे पौलाने रोम मधील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे.
(हे सुद्धा पहाः सुवार्ता, समुद्र, पिलात, पौल)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 23:04 जेंव्हा बाळाचा जन्म होण्याचा समय जवळ आला, तेंव्हा रोमी सरकारने जनगणना करण्यासाठी आपापल्या गावी जाण्यास सांगितले.
- 32:06 तेंव्हा येशूने दुष्टात्म्यास (अशुद्ध आत्म्यास, भुतास) विचारले, ‘‘तूझे नाव काय आहे?’’ तो उत्तरला,‘‘माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.’’ (‘‘लीजन’’ हा शब्द रोमी सेनेतील हजारो सैनिकांच्या गटासाठी होता)
- 39:09 दुस-या दिवशी सकाळीच, यहूदी पुढा-यांनी येशूला रोमी सुभेदार पिलातासमोर आणले.
- 39:12 रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!’’
Strong's
- Strong's: G4514, G4516