mr_tw/bible/names/paul.md

7.0 KiB

पौल, शौल

तथ्य:

पौल सुरूवातीच्या मंडळीचा एक नेता होता, ज्याला इतर अनेक लोकसमूहांना सुवार्ता सांगण्यासाठी येशूने पाठवले होते.

  • पौल एक यहूदी होता, ज्याचा जन्म रोमन शहरातल्या तार्सस येथे झाला होता, आणि म्हणून तो रोमी नागरिकही होता.
  • पौलाला मूळतः शौल या त्याच्या यहुदी नावाने बोलावले जात होते.
  • शौल एक यहुदी धर्मगुरू झाला आणि त्याने ख्रिस्ती बनलेल्या यहूद्यांना अटक केली, कारण त्याला वाटले की त्यांनी येशूवर विश्वास ठेवून देवाची निंदा केली आहे.
  • येशूने स्वतःस शौलाला दिपवणाऱ्या प्रकाशात प्रकट केले, आणि त्याला ख्रिस्ती लोकांना त्रास देणे थांबवण्यास सांगितले.
  • शौलाने येशूवर विश्वास ठेवला आणि त्याच्या यहुदी सहकाऱ्यांना येशुबद्दल शिकवण्यास सुरवात केली.
  • नंतर, देवाने शौलाला, यहुदी नसलेल्या लोकांकडे येशुबद्दल शिकवण्यास पाठवले आणि त्याने रोमन साम्राज्यातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये आणि शहरामध्ये मंडळींची सुरवात केली. या वेळेपर्यंत त्याला "पौल" या रोमन नावाने बोलवण्यास सुरवात झाली.
  • या शहरातील मंडळ्यांमधील ख्रिस्ती लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी पौलाने पत्रे सुद्धा लिहिली. यापैकी, बरीच पत्रे ही नव्या करारात आहेत.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: ख्रिस्ती, यहुदी नेते, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 45:06 शौल नावाचा एक तरूण मनुष्य स्तेफनाला मारणा-या लोकांशी सहमत होता व त्यास दगडमार करणा-यांची वस्त्रे तो सांभाळत होता.
  • 46:01 शौल हा तरुण मनुष्य स्तेफनाला दगडमार करणा-यांची वस्त्रे सांभाळत होता. तो येशूवर विश्वास ठेवत नव्हता, म्हणून तो विश्वासी लोकांचा छळ करत असे.
  • 46:02 शौल दिमिष्काच्या मार्गावर प्रवास करत असतांना, अचानक त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला आणि तो जमिनीवर पडला. शौलाने कोणी तरी हाक मारतांना ऐकले, "शौला! शौला! तू माझा छळ का करतोस?"
  • 46:05 तेव्हा हनन्याने शौलाकडे जाऊन त्याजवर आपले हात ठेवले व म्हणाला, "जो येशू तुला मार्गामध्ये प्रकट झाला, त्याने मला तुझ्याकडे पाठविले आहे, अशासाठी की, तुझी दृष्टी तुला पुन्हा प्राप्त व्हावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस." लगेच शौलाला पुन्हा दिसू लागले, आणि हनन्याने त्यास बाप्तिस्मा दिला.
  • 46:06 लगेच शौल दिमिष्कामध्ये असणाऱ्या यहूद्यांना प्रचार करू लागला व म्हणाला, "येशू हाच देवाचा पुत्र आहे."
  • 46:09 बर्णबा आणि शौल तेथील नवीन विश्वासणा-यांना येशूविषयी अधिक शिक्षण देण्यासाठी व मंडळीला उत्तेजन देण्यासाठी अंत्युखियास गेले.
  • 47:01 शौल संपूर्ण रोमन साम्राज्यामधून प्रवास करत असतांना, त्याने आपल्या "पौल" या रोमन नावाचा उपयोग करु लागला.
  • 47:14 पौल व इतर ख्रिस्ती पुढारी येशूची सुवार्ता सांगत व शिक्षण देत अनेक शहरांमधून प्रवास करत गेले.

Strong's

  • Strong's: G3972, G4569