mr_tw/bible/kt/zion.md

3.0 KiB

सियोन, सियोन पर्वत

व्याख्या:

मूळतः "सियोन" किंवा "सियोन पर्वत" या शब्दांचा संदर्भ गढ किंवा किल्ला ह्याच्याशी येतो, ज्याला दावीद राजाने यबुसी लोकांच्याकडून जिकून घेतले होते. हे दोन्ही शब्द यरुशलेमला संदर्भित करण्याचे इतर मार्ग आहेत.

  • यरुशलेम हे शहर सिनाय पर्वत आणि मोरिया पर्वत या दोन टेकड्यांवर वसलेले होते. नंतर "सियोन" आणि "सियोन पर्वत" या दोन्ही पर्वतांना आणि यरुशलेम शहराला संदर्भित करण्यासाठीच्या सामान्य संज्ञा बनल्या. काहीवेळा त्यांना यरुशलेममध्ये स्थित असलेल्या मंदिराला संदर्भित करण्यासाठी सुद्धा वापरले गेले. (पहा: रूपक
  • दावीदाने सियोन किंवा यरुशलेम हिचे नाव "दाविद्पूर" असे ठेवले. हे दाविदाच्या मूळ गावापासून वेगळे होते, बेथलेहेम, या शहराला सुद्धा दाविदाचे नगर असे म्हंटले जाते.
  • "सियोन" या शब्दाचा उपयोग दुसऱ्या लाक्षणिक अर्थाने इस्राएल किंवा देवाचे आत्मिक राज्य किंवा नवीन स्वर्गीय यरुशलेम, जीला देव निर्माण करील ह्यांना संदर्भित करण्यासाठी सुद्धा केला जातो.

(हे सुद्धा पहा: अब्राहाम, दावीद, यरुशलेम, बेथलेहेम, यबुसी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6726