mr_tw/bible/kt/exhort.md

3.0 KiB

बोध (आवर्जून सांगणे)

व्याख्या:

"बोध" या शब्दाचा अर्थ एखाद्याला जे योग्य आहे ते करण्यासाठी अतिशय उत्साहित आणि आवाहन करणे. अशा प्रोत्साहनाला "बोध" असे म्हंटले जाते.

  • इतर लोकांनी पाप करण्याचे टाळून देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास त्यांचे मान वळवणे हा बोध करण्याचा हेतू आहे.
  • नवीन करार ख्रिस्ती लोकांना प्रेमाने एकमेकांना बोध करण्याबद्दल शिकवते कठोरपणे किंवा एकाएकी नव्हे.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "बोध" हा शब्द "जोरदार आग्रह" किंवा "मान वळवणे" किंवा "सल्ला" म्हणून सुद्धा भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • या शब्दाचे भाषांतर बोध करणारा रागावलेला आहे असा अर्थ देत नाही ह्याची खात्री करा. या शब्दाने सामर्थ्य आणि गांभीर्य पोहोचवले पाहिजे, पण त्याने रागीट भाषणाचा संदर्भ देता कामा नये.
  • बऱ्याच संदर्भामध्ये, "बोध" या शब्दाचे भाषांतर "उत्तेजन" या शब्दापेक्षा वेगळे केले पाहिजे, ज्याचा अर्थ एखाद्यास प्रेरणा देणे, आश्वस्त करणे, किंवा दिलासा देणे असा होतो.
  • सहसा या शब्दाचे भाषांतर "समज देणे" या शब्दापेक्षा वेगळे केले पाहिजे, ज्याचा अर्थ ताकीद देणे किंवा एखाद्याला त्याच्या चुकीच्या वर्तणुकीबद्दल समज देणे असा होतो.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G3867, G3870, G3874, G4389