# बोध (आवर्जून सांगणे) ## व्याख्या: "बोध" या शब्दाचा अर्थ एखाद्याला जे योग्य आहे ते करण्यासाठी अतिशय उत्साहित आणि आवाहन करणे. अशा प्रोत्साहनाला "बोध" असे म्हंटले जाते. * इतर लोकांनी पाप करण्याचे टाळून देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास त्यांचे मान वळवणे हा बोध करण्याचा हेतू आहे. * नवीन करार ख्रिस्ती लोकांना प्रेमाने एकमेकांना बोध करण्याबद्दल शिकवते कठोरपणे किंवा एकाएकी नव्हे. ## भाषांतर सूचना * संदर्भावर आधारित, "बोध" हा शब्द "जोरदार आग्रह" किंवा "मान वळवणे" किंवा "सल्ला" म्हणून सुद्धा भाषांतरित केला जाऊ शकतो. * या शब्दाचे भाषांतर बोध करणारा रागावलेला आहे असा अर्थ देत नाही ह्याची खात्री करा. या शब्दाने सामर्थ्य आणि गांभीर्य पोहोचवले पाहिजे, पण त्याने रागीट भाषणाचा संदर्भ देता कामा नये. * बऱ्याच संदर्भामध्ये, "बोध" या शब्दाचे भाषांतर "उत्तेजन" या शब्दापेक्षा वेगळे केले पाहिजे, ज्याचा अर्थ एखाद्यास प्रेरणा देणे, आश्वस्त करणे, किंवा दिलासा देणे असा होतो. * सहसा या शब्दाचे भाषांतर "समज देणे" या शब्दापेक्षा वेगळे केले पाहिजे, ज्याचा अर्थ ताकीद देणे किंवा एखाद्याला त्याच्या चुकीच्या वर्तणुकीबद्दल समज देणे असा होतो. ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 02:3-4](rc://mr/tn/help/1th/02/03) * [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 02:10-12](rc://mr/tn/help/1th/02/10) * [1 तीमथ्य 05:1-2](rc://mr/tn/help/1ti/05/01) * [लुक 03:18-20](rc://mr/tn/help/luk/03/18) # Strong's * Strong's: G3867, G3870, G3874, G4389