mr_tw/bible/kt/elect.md

7.1 KiB

निवडलेला, निवडलेले, निवडणे, निवडलेले लोक, निवडलेला पुत्र, नियुक्त केलेले

व्याख्या:

"निवडलेले" या शब्दाचा शब्दशः अर्थ "निवडलेला पुत्र" किंवा "निवडलेले लोक" असा होतो, आणि त्याचा संदर्भ, ज्यांना देवाने त्याचे लोक होण्याकरिता नियुक्त आणि निवडलेल्या लोकांशी येतो. "निवडलेला" किंवा "देवाचा निवडलेला पुत्र" हे एक शीर्षक आहे जे येशूला संदर्भित करते, जो निवडलेला मसिहा आहे.

  • "निवडणे" या शब्दाचा अर्थ एखाद्याला किंवा काहीतरी निवडणे किंवा कश्याचा तरी निर्णय घेणे. हे सहसा देवाने लोकांना त्याचे होण्याकरिता आणि त्याची सेवा करण्याकरिता नियुक्त करण्याशी संदर्भित आहे.
  • "निवडलेले असणे" ह्याचा अर्थ "निवड केलेली" किंवा "नियुक्त केलेले" असणे किंवा काहीतरी करणे असा होतो.
  • देव लोकांना पवित्र होण्यासाठी, आणि चांगली आत्मिक फळे धारण करण्यासाठी वेगळे करून निवडतो. म्हणूनच त्यांना "निवडलेले (लोक)" किंवा "नियुक्त केलेले" असे म्हणतात
  • पवित्र शास्त्रामध्ये "निवडलेला एक" या शब्दाचा उपयोग ठराविक लोकांचा संदर्भ देण्यासाठी केला आजतो, जसे की, मोशे, दावीद राजा ज्यांना देवाने त्याच्या लोकांवर पुढारी होण्यासाठी नियुक्त केले होते. देवाचे निवडलेले लोक यामध्ये, ते इस्राएल राष्ट्राला सूचित करण्यासाठी देखील वापरला जातो.
  • "नियुक्त केलेले" हा वाक्यांश हा एक जुना शब्द आहे ज्याचा अर्थ "निवडलेला असा" किंवा "निवडलेले लोक" असा होतो. मूळ भाषेमध्ये हा वाक्यांश अनेकवचन रुपामध्ये येतो, जेंव्हा तो ख्रिस्तामधील विश्वासनाऱ्यांच्या संदर्भात वापरला जातो.
  • जुन्या इंग्रजी पवित्र शास्त्रांच्या आवृत्त्यामध्ये, "नियुक्त केलेले" हा शब्द दोन्ही जुन्या आणि नव्या करारामध्ये "निवडलेला असा" ह्याच्या भाषांतरासाठी वापरला जातो. अधिक आधुनिक आवृत्त्या "नियुक्त केलेले" हा शब्द फक्त नवीन करारामध्येच वापरतात, ज्यांचा संदर्भ लोकांशी आहे, ज्यांना देवाने येशूच्या विश्वासाद्वारे वाचवले होते. पवित्र शास्त्रातील इतर ठिकाणच्या मजकुरामध्ये, या शब्दाचे भाषांतर ते शब्दशः "निवडलेले लोक" म्हणून करतात.

भाषांतर सूचना

  • "नियुक्त केलेले" या शब्दाचे भाषांतर, अशा शब्दाने किंवा वाक्यांशाने ज्याचा अर्थ "निवडलेला एक" किंवा "निवडलेले लोक" या शब्दांनी करणे सर्वोत्तम राहील. ह्याचे भाषांतर "देवाने निवडलेले लोक" किंवा "असा एक ज्याला देवाने त्याचे लोक होण्याकरिता निवडले आहे" असे केले जाऊ शकते.
  • "जो निवडलेला आहे" या वाक्यांशाचे भाषांतर "ज्याला नियुक्त केलेले आहे" किंवा "जो निवडलेला आहे" किंवा "ज्याला देवाने निवडले आहे" असे केले जाऊ शकते.
  • "मी तुला निवडले आहे" ह्याचे भाषांतर "मी तुला नियुक्त केले आहे" किंवा "मी तुला निवडले आहे" असे केले जाऊ शकते.
  • येशूच्या संदर्भात, "निवडलेला" ह्याचे भाषांतर "देवाचा निवडलेला" किंवा "देवाने नियुक्त केलेला मशीहा" किंवा "देवाने नियुक्त केलेला (लोकांना वाचवण्यासाठी)" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: नेमून देणे, ख्रिस्त)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H970, H972, H977, H1262, H1305, H4005, H6901, G138, G140, G1586, G1588, G1589, G1951, G4400, G4401, G4758, G4899, G5500