mr_tw/bible/kt/dayofthelord.md

4.0 KiB

प्रभूचा दिवस, यहोवाचा दिवस

व्याख्या:

जुन्या करारातील शब्द, "यहोवाचा दिवस" ह्याचा उपयोग विशिष्ठ वेळेस, जेंव्हा देव लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा करेल, ह्याला संदर्भित करण्यासाठी केला जातो.

  • नवीन करारातील शब्द, "प्रभूचा दिवस" हा सहसा अशा दिवसाला किंवा वेळेला संदर्भित करतो, जेंव्हा शेवटच्या काळी प्रभु येशू लोकांचा न्याय करण्यासाठी येईल.
  • या शेवटच्या, भविष्यातील न्याय आणि पुनरुत्थाणाला सुद्धा काही वेळा "शेवटचा दिवस" असे संदर्भित केले आहे. जेंव्हा प्रभु येशू पाप्यांचा न्याय करण्यासाठी आणि त्याची सत्ता कायमची स्थापन करण्यासाठी येईल तेंव्हा हा काळ सुरु होईल.
  • या वाक्यांशातील "दिवस" या शब्दाचा संदर्भ काहीवेळेस प्रत्यक्षात दिवस किंवा त्याचा संदर्भ कदाचित "वेळ" किंवा "प्रसंग" जो एका दिवसापेक्षा मोठा आहे ह्याच्याशी येऊ शकतो.
  • काहीवेळा शिक्षा हा शब्द, जे लोक विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यावर "देवाचा क्रोध उतरणे" ह्यासाठी संदर्भित केला जातो.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "यहोवाचा दिवस" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "यहोवाची वेळ" किंवा "अशी वेळ, जेंव्हा यहोवा त्याच्या शत्रूंना शिक्षा करेल" किंवा "यहोवाच्या क्रोधाचा समय" ह्यांचा समावेश होतो.
  • "प्रभूचा दिवस" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "प्रभूच्या न्यायाची वेळ" किंवा "प्रभू येशू लोकांचा न्याय करण्यासाठी परत येण्याचा समय" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: दिवस, न्यायाचा दीवस, प्रभू, पुनरुत्थान, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3068, H3117, G2250, G2962