mr_tw/bible/kt/bornagain.md

4.6 KiB

पुन्हा जन्मलेला, देवापासून जन्मलेला, नवा जन्म

व्याख्या:

आत्मिकदृष्ट्या मेलेल्या व्यक्तीला आत्मिकदृष्ट्या जिवंत करण्यासाठी होणाऱ्या बदलाचा देवाचा अर्थ काय आहे, ह्याचे वर्णन करण्याकरिता "पुन्हा जन्मलेला" या शब्दाचा उपयोग सर्वप्रथम येशूने केला. "देवापासून जन्मलेला" आणि "आत्म्यापासून जन्मलेला" या शब्दांचा संदर्भ, एखाद्या व्यक्तीला नवीन अध्यात्मिक जीवन दिल्या जाण्याशी आहे.

  • असर्व मानवांचा जन्म आत्मिकदृष्ट्या मेलेले असा झाला आहे, आणि जेंव्हा ते येशूला त्यांचा तारणारा म्हणून स्वीकारतात तेंव्हा त्यांना "नवीन जन्म" दिला जातो.
  • नवीन आत्मिक जीवनाच्या क्षणी, देवाचा पवित्र आत्मा नवीन विश्वासणाऱ्यांमध्ये राहायला सुरवात करतो, आणि त्याच्या आयुष्यामध्ये चांगली आत्मिक फळे निर्माण करण्यासाठी त्याला सक्षम करतो.
  • एखाद्या व्यक्तीला पुन्हा जन्म देणे आणि त्याला आपले मुल बनवणे हे देवाचे काम आहे.

भाषांतर सूचना

  • "पुन्हा जन्मलेला" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "नवीन जन्म" किंवा "आत्मिक जन्म" ह्यांचा समावेश होतो.
  • या शब्दाचे शब्दशः भाषांतर करणे आणि भाषेतील जन्मासाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य शब्दाचा उपयोग करणे हे सर्वोत्तम राहील.
  • "नवीन जन्म" या शब्दाचे भाषांतर कदाचित "आत्मिक जन्म" असे केले जाऊ शकते.
  • "देवापासून जन्मलेला" या वाक्यांशाचे भाषांतर "नवजात बालकाप्रमाणे नवीन जीवन असण्यासाठी देव कारणीभूत झालेला" किंवा "देवापासून नवीन जीवन मिळालेला" असे केले जाऊ शकते.
  • त्याचप्रकारे, "आत्म्यापासून जन्मलेला" ह्याचे भाषांतर "पवित्र आत्म्यापासून नवीन जीवन मिळालेला" किंवा "देवाचे मुल होण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे सक्षम केला गेलेला" किंवा "नवजात बालकाप्रमाणे नवीन जीवन असण्यासाठी पवित्र आत्मा कारणीभूत झालेला" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पहाः पवित्र आत्मा, वाचवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G313, G509, G1080, G3824