mr_tw/bible/kt/holyspirit.md

7.6 KiB

पवित्र आत्मा, देवाचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा, आत्मा

तथ्य:

हे सर्व शब्द पवित्र आत्म्याशी संदर्भित आहेत, जो देव आहे. एक खरा देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यामध्ये अनंतकाळासाठी अस्तित्वात आहे.

  • पवित्र आत्म्याचा संदर्भ "आत्मा" आणि "यहोवाचा आत्मा" आणि "सत्याचा आत्मा" म्हणून देखील आलेला आहे.
  • पवित्र आत्मा देव आहे म्हणून, तो पूर्णपणे पवित्र आहे, अमर्यादपणे शुद्ध आहे, आणि त्याच्या सर्व स्वभावाने आणि जी प्रत्येक गोष्ट तो करतो त्याच्यामध्ये नैतिकदृष्ट्या परिपूर्ण आहे.
  • पिता आणि पुत्र यांच्या बरोबर, पवित्र आत्मा जगाची निर्मिती करण्यात सक्रिय होता.
  • जेंव्हा देवाचा पुत्र, येशू, स्वर्गात परत गेला, देवाने पवित्र आत्म्याला त्याच्या लोकांचे नेतृत्व करण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी पाठवले.
  • पवित्र आत्म्याने येशूचे मार्गदर्शन केले आणि जे लोक येशुंवर विश्वास ठेवतात त्यांना तो मार्गदर्शन करतो.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचा "पवित्र" आणि "आत्मा" यांचे भाषांतर करण्यासाठी वापरलेल्या शब्दांद्वारे भाषांतर करता येईल.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "शुद्ध आत्मा" किंवा "आत्माजो पवित्र आहे" किंवा "देव जो आत्मा" यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पाहा: पवित्र, आत्मा, देव, परमेश्वर, देव पिता, देवाचा पुत्र, भेट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 01:01 परंतु देवाचा आत्मा तेथे जलावर (पाण्यावर) होता.
  • 24:08 जेव्हा येशू बाप्तिस्म्यानंतर पाण्यातून वर आला, तेंव्हा देवाचा आत्मा कबूतराच्या रुपामध्ये येऊन त्याच्यावर थांबला.
  • 26:01 सैतानाच्या परीक्षेवर विजय मिळविल्यावर येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होऊन आपण राहत असलेल्या गालील या ठिकाणी परत आला.
  • 26:03 येशूने वाचले,‘‘परमेश्वराने त्याचा आत्मा मला दिला आहे, ते अशासाठी की गरीबांस सुवार्ता सांगावी, धरुन नेलेल्यांची सुटका व अंधळयांस पुन्हा दृष्टिचा लाभ व्हावा व ठेचले जात आहेत त्यांस सोडवुन पाठवावे हयाची घोषणा करावी.
  • 42:10 म्हणून, तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा.
  • 43:03 ते सर्व __पवित्र आत्म्याने __ भरून गेले व वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले.
  • 43:08 आणि येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे त्याने आम्हासाठी t__पवित्र आत्माt__ पाठविला आहे. आता जे तुम्ही पाहाता व ऐकत आहात, त्या सर्व गोष्टी पवित्र आत्मा करीत आहे.
  • 43:11 पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील. मग तो तुम्हास पवित्र आत्म्याचे दान सुद्धा देईल."
  • 45:01 तो एक प्रतिष्ठित पुरूष होता, तो ज्ञानी व पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा होता.

Strong's

  • Strong's: H3068, H6944, H7307, G40, G4151