mr_tw/bible/kt/adoption.md

3.6 KiB

दत्तकपण, दत्तक,

व्याख्या:

"दत्तक" आणि "दत्तकपण" या शब्दांचा संदर्भ कायद्याने एखाद्या व्यक्तीचे मुल बनण्याशी आहे जे त्याचे जैविक पालक नसतात.

  • पवित्र शास्त्रामध्ये "दत्तकपण" आणि "दत्तक घेणे" हा शब्द हे वर्णन करण्यासाठी वापरण्यात आला आहे कि कसा देव लोकांना आपल्या कुटुंबाचा भाग बनवून त्यांना आपले आध्यात्मिक मुले आणि मुली बनवितो.
  • दत्तक मुलांप्रमाणे, देव विश्वासणाऱ्यांना मुले व मुलींचे सर्व विशेषाधिकार देऊन येशू ख्रिस्ताबरोबर सह-वारस बनवितो.

भाषांतर सूचना

  • पालक-बालकांच्या संबंधाच्या विशेष वर्णनाचे भाषांतर करण्यासाठी या शब्दाचा एक विशेष शब्द म्हणून अनुवाद केला जाऊ शकतो. हे समजल्याची खात्री करा की ह्याला एक लाक्षणिक किंवा आध्यात्मिक अर्थ आहे.
  • "मुल म्हणून अनुभव स्वीकारणे" हा वाक्यांशाचा "परमेश्वराकडून मुल म्हणून स्वीकारले जाणे" किंवा "परमेश्वराचे मुल (आध्यात्मिक) बनणे" म्हणून अनुवाद केला जाऊ शकतो.
  • "मुलांना दत्तक घेण्याची प्रतीक्षा करणे" ह्याचा अनुवाद "परमेश्वराचे मुल बनण्याकडे पाहणे" किंवा "परमेश्वर मुल म्हणून आपला स्वीकार करील या अपेक्षेने वाट पाहणे" असे भाषांतर केले जाऊ शकते.
  • "त्यांना दत्तक घेणे" या शब्दाचे भाषांतर "त्यांना स्वत: च्या मुलांसारखे स्वीकारणे" किंवा "त्यांना स्वतःची (आध्यात्मिक) मुले बनवणे" म्हणून केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: वारस, वारसा, आत्मा)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G5206