mr_tw/bible/kt/reconcile.md

3.1 KiB

समेट करणे, समेट केला, समेट

व्याख्या:

"समेट करणे" आणि "समेट" या शब्दांचा संदर्भ दोन व्यक्तींच्यामध्ये "शांती प्रस्थापित" करण्याशी येतो, जे पूर्वी एकमेकांचे शत्रू होते. "समेट" ही शांती प्रस्थापित करण्याची क्रिया आहे.

  • पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दाचा सहसा संदर्भ देवाने त्याच्या पुत्राच्या, येशू ख्रिस्ताच्या, बलीदानाद्वारे, त्याचा लोकांचा त्याच्याशी समेट घडवून आणण्याशी येतो.
  • पाप केल्यामुळे, सर्व मनुष्यप्राणी हे देवाचे शत्रू बनले होते. पण त्याच्या करुणामय प्रेमामुळे, देवाने त्याच्या लोकांना त्याच्याशी येशूच्या द्वारे समेटाचा मार्ग पुरवला.
  • पापाची भरपाई म्हणून येशूच्या बलीदानावर विश्वास ठेवून लोकांच्या पापांची क्षमा होते, आणि ते देवाबरोबर शांतीने राहू शकतात.

भाषांतर सूचना:

  • "समेट करणे" या शब्दाचे भाषांतर "शांती प्रस्थापित करणे" किंवा "चांगले संबंध पुनःस्थापित करणे" किंवा "मित्र बनण्यास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
  • "समेट" ह्याचे भाषांतर "चांगले संबंध पुनःस्थापित करत असणे" किंवा "शांती बनवत असणे" किंवा "शांतीमय संबंधास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: शांती, बलिदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: