mr_tw/bible/other/peace.md

5.4 KiB

शांती, शांत, शांतता प्रस्थापित करणारा

व्याख्या:

"शांती" या शब्दाचा अर्थ असा आहे की संघर्ष किंवा चिंता, किंवा भीती नसल्याची भावना. "शांत" असलेल्या व्यक्तीला सुखरुप आणि सुरक्षित असल्यास स्थिर आणि आश्वासित वाटते.

  • जुन्या करारामध्ये, "शांती" या शब्दाचा अर्थ बहुधा एखाद्या व्यक्तीचे कल्याण, निरोगीपणा किंवा संपूर्णपणाची सामान्य भावना असते.
  • "शांती" हा शब्दा अशा काळाचा देखील संदर्भ घेऊ शकतो जेव्हा लोकांचा समुह किंवा देश एकमेकांशी भांडत नाहीत. या लोकांचे "शांततापूर्ण संबंध" असल्याचे म्हटले जाते.
  • एखाद्या व्यक्तीशी किंवा लोकांच्या समूहाशी "शांती बनवणे" म्हणजे लढाई थांबविण्याकरिता कारवाई करणे होय.
  • एक "शांती प्रस्थापित करणारा" असा व्यक्ती आहे जो लोकांना एकमेकांशी शांततेत जगण्यासाठी प्रभावित करण्यासाठी गोष्टी करतो आणि सांगतो.
  • इतर लोकांशी "शांततेत" असणे म्हणजे त्या लोकांविरुद्ध लढा न देण्याच्या स्थितीत असणे.
  • जेव्हा देव लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवितो तेव्हा देव आणि लोक यांच्यात चांगले किंवा योग्य नाते असते. याला "देवाची शांती" असे म्हणतात.
  • "कृपा आणि शांती" हे अभिवादन प्रेषितांनी त्यांच्या सह विश्वासणाऱ्यांसाठी त्यांच्या पत्रांमध्ये आशीर्वाद म्हणून वापरले आहे.
  • "शांती" या शब्दाचा अर्थ इतर लोकांशी किंवा देवाशी चांगला संबंध असणे असा देखील होऊ शकतो.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 05: 1-3]
  • [प्रेषितांचे कृत्ये 07:26]
  • [कलस्सैकरांस पत्र 01: 18-20]
  • [कलस्सैकरांस पत्र 03:15]
  • [गलतीकरांस पत्र 05:23]
  • [लुक 07:50]
  • [लुक 12:51]
  • [मार्क 04:39]
  • [मत्तय 05:09]
  • [मत्तय 10:13]

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • [15:06] देवाने इस्राएल लोकांना कनानातील कोणत्याही लोकांशी शांतीचा करार न करण्याची आज्ञा दिली होती.
  • [15:12] मग देवाने सर्व सीमेबरोबर इस्राएलास शांती दिली.
  • [16:03] मग देवाने एक सुटका करणारा दिला ज्याने त्यांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले आणि देशास__शांती__आणली.
  • [21:13] इतर लोकांच्या पापाची शिक्षा भोगण्यास तो (मसीहा) मरणार. त्याने घेतलेली शिक्षा देव आणि लोक यांच्यात शांती आणेल.
  • [48:14] दाविद हा इस्राएलाचा राजा होता, परंतु येशू संपूर्ण विश्वाचा राजा आहे! तो परत येईल आणि त्याच्या राज्यावर न्यायाने आणि शांतीने कायमचा राज्य करील.
  • [50:17] येशू आपल्या राज्यात शांतीने आणि न्यायाने राज्य करील, आणि तो आपल्या लोकांबरोबर कायमचा राहील.

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: H5117, H7961, H7962, H7965, H799, H8001, H8002, H8003, H8252, G2514, G1515, G1516, G1518, G1518, G222