mr_tw/bible/kt/judge.md

6.8 KiB
Raw Blame History

न्याय, न्यायाधीश, निवडा,

व्याख्या:

"न्याय" आणि "निवडा" या शब्दांचा संदर्भ, काहीतरी नैतिकदृष्ट्या बरोबर की चूक आहे ह्याचा निर्णय करण्याकरिता येतो.

  • "देवाचा निवाडा" हा शब्द सहसा, काश्यालातरी किंवा कोणालातरी पापी म्हणून दोषी ठरवण्याच्या देवाच्या निर्णयाशी संदर्भित आहे.
  • देवाच्या निवाड्यामध्ये सहसा लोकांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षेचा समावेश असतो.
  • "न्याय" या शब्दाचा अर्थ "दोष लावणे" असाही होतो. या पद्धतीने कोणावरही दोष लावू नका असे देवाने लोकांना सूचित केले.
  • "दोघांमध्ये मध्यस्थी करणे" किंवा "दोघांमध्ये निवाडा करणे" या वाक्यांशाचा दुसरा अर्थ, दोघांमधील वादामध्ये कोण बरोबर आहे ह्याचा निर्णय देणे, असा होतो.
  • काही संदर्भामध्ये, "देवाचे "निर्णय" म्हणजे जे काही त्याने ठरवले आहे, ते बरोबर आणि योग्य आहे. ते त्याच्या नियम, कायदे किंवा नियमांप्रमाणेच समान आहेत.
  • "निवडा" हा शब्द, सुज्ञपणे निर्णय घेण्याच्या क्षमतेला संदर्भित करतो. ज्या व्यक्तीच्या "निवाड्यामध्ये" कमतरता आहे, त्याच्याकडे सुज्ञपणे निर्णय घेण्यासाठी सुज्ञान नाही.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर "न्याय" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "निर्णय घेणे" किंवा "दोषी ठरवणे" किंवा "शिक्षा देणे" किंवा "हुकुम देणे" यांचा समावेश होतो.
  • "निवाडा" या शब्दाचे भाषांतर "शिक्षा देणे" किंवा "निर्णय देणे" किंवा "अधिकृत निर्णय" किंवा "हुकुम देणे" किंवा "दोषी ठरवणे" असे केले जाते.
  • काही संदर्भामध्ये, "च्या निवाड्यामध्ये" या वाक्यांशाचे भाषांतर "निवाड्याच्या दिवशी" किंवा "जेंव्हा देव लोकांचा निवाडा करेल त्या वेळी" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पहा: हुकुम देणे, न्याय, न्यायाचा दिवस, फक्त, कायदा, नियम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 19:16 संदेष्टयांनी त्यांना इशारा दिला की जर त्यांनी आपला वाईट मार्ग सोडून देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर देव त्यांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा करील.

  • 21:08 राजा म्हणजे जो लोकांवर राज्य करतो व त्यांचा न्याय करतो. आपला पूर्वज दाविद याच्या सिंहासनावर बसणारा मसिहा हा एक परिपूर्ण राजा असेल. तो संपूर्ण जगावर सर्वकाळ राज्य करील, आणि प्रामाणिकपणे न्याय करील व योग्य निर्णय घेईल.

  • 39:04 तेंव्हा महायाजकाने रागाने आपली वस्त्रे फाडिली व अन्य धार्मीक पुढा-यांसमोर मोठयाने म्हणाला, ‘‘आता आम्हास आणखी पुराव्याची गरज नाही! तो देवाचा पुत्र आहे असे त्याने म्हटले हे तुम्ही स्वत: ऐकले आहे. तुमचा निवाडा काय आहे?

  • 50:14 परंतु येशूवर विश्वास न ठेवणाऱ्या प्रत्येकाचा देव न्याय करील. तो त्यांना नरकात टाकील, ज्या ठिकाणी सर्वकाळ रडणे व दुःखाने दात खाणे सर्वकाळ चालेल.

  • Strong's: H148, H430, H1777, H1778, H1779, H1780, H1781, H1782, H2940, H4055, H4941, H6414, H6415, H6416, H6417, H6419, H6485, H8196, H8199, H8201, G144, G350, G968, G1106, G1252, G1341, G1345, G1348, G1349, G2917, G2919, G2920, G2922, G2923, G4232