2.9 KiB
2.9 KiB
भूतग्रस्त
व्याख्या:
एक व्यक्ती जो भूतग्रस्त आहे, त्याच्यात भुते किंवा दुष्ट आत्मा असतात ते त्याच्या कृतींना आणि विचारांना नियंत्रित करतात.
- सहसा भूतग्रस्त व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना दुखापत करेल, कारण भुत त्याला तसे करण्यास कारणीभूत होते.
- येशूने भूतग्रस्त लोकांच्यातून भूतांना निघण्याची आज्ञा देऊन त्यांना बरे केले. ह्याला सहसा भुते "बाहेर काढणे" असे म्हणतात.
भाषांतर सूचना
- या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "भूतांच्या नियंत्रणाखाली" किंवा "दुष्ट आत्म्यानी नियंत्रित केलेले" किंवा "दुष्ट आत्मा आत मध्ये असणे" यांचा समावेश आहे.
(हे सुद्धा पहा: भुत)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
भुते लागलेले असे अनेक लोक येशूकडे आणिले गेले.
-
सरोवराच्या पलिकडे जाताच एक भूतग्रस्त मनुष्य येशूकडे धावत आला.
-
भूतग्रस्त मनुष्य मोठयाने ओरडला, ‘‘परात्पर देवाच्या पुत्रा येशू , तू मध्ये का पडतोस?’’ कृपया मला छळू नकोस !’’
-
तेंव्हा नगरातील लोकांनी येऊन त्या भूतग्रस्त मनुष्यास पाहिले.
-
दररोज ते त्या ठिकाणी जात असतांना, एक दासी व दुष्टात्माग्रस्त मुलगी त्यांच्यामागे चालू लागली.
-
Strong's: G1139