# भूतग्रस्त ## व्याख्या: एक व्यक्ती जो भूतग्रस्त आहे, त्याच्यात भुते किंवा दुष्ट आत्मा असतात ते त्याच्या कृतींना आणि विचारांना नियंत्रित करतात. * सहसा भूतग्रस्त व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना दुखापत करेल, कारण भुत त्याला तसे करण्यास कारणीभूत होते. * येशूने भूतग्रस्त लोकांच्यातून भूतांना निघण्याची आज्ञा देऊन त्यांना बरे केले. ह्याला सहसा भुते "बाहेर काढणे" असे म्हणतात. ## भाषांतर सूचना * या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "भूतांच्या नियंत्रणाखाली" किंवा "दुष्ट आत्म्यानी नियंत्रित केलेले" किंवा "दुष्ट आत्मा आत मध्ये असणे" यांचा समावेश आहे. (हे सुद्धा पहा: [भुत](../kt/demon.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [मार्क 01:32-34](rc://*/tn/help/mrk/01/32) * [मत्तय 04:23-25](rc://*/tn/help/mat/04/23) * [मत्तय 08:16-17](rc://*/tn/help/mat/08/16) * [मत्तय 08:33-34](rc://*/tn/help/mat/08/33) ## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे: * __भुते लागलेले__ असे अनेक लोक येशूकडे आणिले गेले. * सरोवराच्या पलिकडे जाताच एक __भूतग्रस्त__ मनुष्य येशूकडे धावत आला. * __भूतग्रस्त__ मनुष्य मोठयाने ओरडला, ‘‘परात्पर देवाच्या पुत्रा येशू , तू मध्ये का पडतोस?’’ कृपया मला छळू नकोस !’’ * तेंव्हा नगरातील लोकांनी येऊन त्या __भूतग्रस्त__ मनुष्यास पाहिले. * दररोज ते त्या ठिकाणी जात असतांना, एक दासी व __दुष्टात्माग्रस्त__ मुलगी त्यांच्यामागे चालू लागली. * Strong's: G1139