mr_tw/bible/kt/deacon.md

2.5 KiB

सेवक

व्याख्या:

सेवक हा असा व्यक्ती आहे, जो स्थानिक मंडळीमध्ये सेवा करतो, त्याच्या सहकारी विश्वासणाऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजा, जसे की अन्न किंवा पैसा ह्यासाठी मदत करतो.

  • "सेवक (DEACON)" हा शब्द थेट ग्रीक भाषेतून घेतला आहे, त्याचा अर्थ "सेवक" किंवा "सेवा करणारा" असा होतो.
  • आद्य ख्रिस्ती लोकांच्या काळापासून, सेवक असणे हा मंडळीच्या शरीरामधील सु-परिभाषित भूमिका आणि सेवा आहे.
  • उदाहरणार्थ, नवीन करारामध्ये, सेवक या गोष्टीची खात्री करत की, विश्वासणाऱ्यांनी जे काही पैसे किंवा अन्न दिले आहे, ते त्या मंडळींच्या विधावांमध्ये समान वाटले गेले आहेत.
  • "सेवक" या शब्दाचे भाषांतर, "मंडळीची सेवा करणारा" किंवा "मंडळीचा कामगार" किंवा "मंडळीचा सेवक" किंवा इतर काही वाक्यांशांनी जे असे दाखवतील की, एखाद्या व्यक्तीला, एखादे ठराविक काम करण्यासाठी, जे स्थानिक ख्रिस्ती समुदायाच्या फायद्याचे आहे, त्यासाठी औपचारिकरित्या नियुक्त केलेले आहे.

(हे सुद्धा पहा: सेवा करणारा, सेवक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: