mr_tw/bible/other/servant.md

12 KiB

सेवक, सेवा करणे, गुलाम, कामगार, तरुण माणूस, तरुण स्त्रिया

व्याख्या:

"सेवा करणे" या शब्दाचा अर्थ सामान्यत: कार्य करणे, आणि ही संकल्पना विविध संदर्भांमध्ये लागू केली जाऊ शकते. या शब्दाचा अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती पसंतीने किंवा बळजबरीने दुसऱ्या व्यक्तीसाठी काम करतो (किंवा आज्ञा पाळतो). पवित्र शास्त्रात पुढीलपैकी कोणत्याही व्यक्तीला "सेवक" म्हटले जाऊ शकते: गुलाम, एक तरुण महिला कामगार, एक तरुण पुरुष कामगार, जो देवाची आज्ञा पाळतो आणि इतर. बायबलसंबंधीच्या काळात, "सेवक" आणि "गुलाम" यांच्यात आजच्यापेक्षा कमी फरक होता. सेवक आणि गुलाम दोघेही घराचा एक महत्त्वाचा भाग होते आणि बऱ्याचदा सेवकांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वागणूक दिली जात असे. कधीकधी एखादा सेवक त्याच्या मालकासाठी आजीवन सेवक होणे निवड असे.

  • एक गुलाम हा एक प्रकारचा सेवक होता तो ज्या व्यक्तीकडे काम करत असे त्या व्यक्तीची संपत्ती होता. ज्याने गुलाम विकत घेतला त्याला त्याचा "मालक" किंवा "स्वामी" असे म्हणत. काही स्वामी त्यांच्या गुलामांशी अत्यंत क्रौर्याने वागले, तर इतर स्वामी त्यांच्या गुलामांशी घरातील एक मौल्यवान सदस्य म्हणून चांगले वागले.
  • प्राचीन काळी, काही लोक त्या व्यक्तीचे कर्ज फेडण्यासाठी स्वेच्छेने एखाद्या व्यक्तीचे गुलाम झाले.
  • पाहुण्यांची सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात, या शब्दाचा अर्थ "काळजी घ्या" किंवा "जेवण द्या" किंवा "अन्न पुरवठा करा" असा आहे. जेव्हा येशूने शिष्यांना लोकांना मासे "वाढण्यास" सांगितले तेव्हा त्याचे भाषांतर "वितरित" किंवा "वाटप करणे" किंवा "देणे" असे केले जाऊ शकते.
  • पवित्र शास्त्रात, "मी तुमचा सेवक आहे" हा शब्द राजासारख्या उच्च दर्जाच्या व्यक्तीला आदर आणि सेवेचे चिन्ह म्हणून वापरला गेला. याचा अर्थ असा नाही की बोलणारी व्यक्ती वास्तविक नोकर होती.
  • "सेवा करणे" या शब्दाचे भाषांतर "मदत करा" किंवा "काम करा" किंवा "काळजी घ्या" किंवा "आज्ञा पाळा" असे म्हणून केले जाऊ शकते, हे संदर्भावर अवलंबुन आहे.
  • जुन्या करारामध्ये, देवाचे संदेष्टे आणि इतर लोक ज्यांनी देवाची उपासना केली त्यांनी बऱ्याचदा त्याचे "सेवक" म्हणून संबोधले जात असे.
  • "देवाची सेवा करणे" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाची उपासना करणे आणि आज्ञा पालन करणे" किंवा "देवाने आज्ञा केलेले कार्य करणे" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • नवीन करारामध्ये, ख्रिस्तावर विश्वास ठेवून देवाचे आज्ञा पालन करणारे लोक बऱ्याचदा त्याचे "सेवक" म्हणून ओळखले जाते
  • "मेजवानीची सेवा" करणे म्हणजे जे लोक मेजावर बसले आहेत त्यांच्याकडे अन्न आणणे किंवा अधिक सामान्यत: "अन्नाचे वितरण" करणे होय.
  • जे लोक इतरांना देवाबद्दल शिकवतात त्यांना देव आणि ज्यांना शिकवतात त्या दोघांची सेवा करतात असे म्हणतात.
  • प्रेषित पौलाने करिंथ येथील ख्रिस्ती लोकांना पत्र लिहिले की ते जुन्या कराराचे "सेवा करत" कसे करत असे. याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करणे होय. आता ते नवीन कराराची "सेवा करतात". म्हणजेच, वधस्तंभावर येशूच्या बलिदानामुळे, येशूवरील विश्वासणारे पवित्र आत्म्याने देवाला संतुष्ट करण्यासाठी आणि पवित्र जीवन जगण्यास सक्षम केले गेले.
  • पौल त्यांच्या जुन्या किंवा नवीन कराराच्या "सेवेच्या" दृष्टीने त्यांच्या कृतींबद्दल बोलतो. या वाक्यांशाचे भाषांतर "सेवा करणे" किंवा "आज्ञा पालन करणे" किंवा "भक्ती करणे" असे म्हणून केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [वचनबद्ध], [गुलाम बनविणे], [घरगुती], [प्रभु], [आज्ञा पाळणे], [नीतिमान], [करार], [नियम],)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [प्रेषितांचे कृत्ये 04: 29-31]
  • [प्रेषितांचे कृत्ये10: 7-8]
  • [कलस्सैकरांस पत्र 01: 7-8]
  • [कलस्सैकरांस पत्र 03: 22-25]
  • [उत्पत्ति 21: 10-11]
  • [लुक 12: 47-48]
  • [मार्क 09:33-35]
  • [मत्तय 10:24-25]
  • [मत्तय 13: 27-28]
  • [2 तीमथ्याला पत्र 02: 3-5]
  • [प्रेषितांचे कृत्ये 06: 2-4]
  • [उत्पत्ति 25:23]
  • [लुक 04: 8]
  • [लुक 12: 37-38]
  • [लुक 22: 26-27]
  • [मार्क 08: 7-10]
  • [मत्तय 04: 10-11]
  • [मत्तय 06:24]

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • [06:01] जेव्हा अब्राहाम खूप म्हातारा झाला होता आणि त्याचा मुलगा इसहाक एक मनुष्य झाला होता, तेव्हा अब्राहामाने आपल्या एका __ सेवकाला__ आपल्या मुलगा, इसहाक, यासाठी बायको शोधण्यासाठी, त्याचे नातेवाईक राहत असलेल्या देशात परत पाठविसे.
  • __ [08:04] __ गुलामाच्या व्यापाऱ्यांनी योसेफाला गुलाम म्हणून श्रीमंत सरकारी अधिकाला विकले.
  • [09:13] "मी (देव) तुला (मोशे) फारोकडे पाठवीन जेणेकरून तू मिसरातून__ गुलामगिरीमध्ये__असलेल्या इस्राएल लोकांना बाहेर काढशील."
  • [19:10] नंतर एलीयाने प्रार्थना केली, "हे याहवे, अब्राहाम, इसहाक आणि याकोबाच्या देवा, आज आम्हाला दाखव की तू इस्राएलचा देव आहेस आणि मी तुझा सेवक आहे."
  • [29:03] "सेवक कर्ज फेडू शकत नसल्यामुळे राजा म्हणाला,"या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला त्याच्या कर्जाची भरपाई करण्यासाठी __ गुलाम__ म्हणून विका."
  • [35:06] "माझ्या सर्व बापाच्या सेवकांना भरपूर खायला आहे, आणि तरीही मी येथे उपाशी आहे."
  • [47:04] गुलाम मुलगी ते चालत असताना ओरडत राहिली, "हे लोक परात्पर देवाचे सेवक आहेत
  • [50:04] येशू देखील म्हणाला, " सेवक त्याच्या स्वामीपेक्षा मोठा नाही."

शब्द संख्या:

  • (सेवक) स्ट्रॉन्गचे: एच5288, एच5647, एच5649, एच5650, एच5657, एच7916, एच8198, एच8334, जी1249, जी1401, जी1402, जी2324, जी3407, जी3411, जी3610, जी3816, जी4983, जी5257
  • (सेवा करणे) एच327, एच3547, एच4929, एच4931, एच5647, एच5656, एच5673, एच5975, एच6213, एच6399, एच6402, एच6440, एच6633, एच6635, एच7272, एच8104, एच8120, एच8199, एच8278, एच8334, जी1247, जी1248, जी1398, जी1402, जी1438, जी1983, जी2064, जी2212, जी2323, जी2999, जी3000, जी3009, जी4337, जी4342, जी4754, जी5087, जी5256