mr_tw/bible/kt/altar.md

3.3 KiB
Raw Blame History

वेदी, वेद्या

व्याख्या:

वेदी एक उभारलेली रचना होती ज्याच्या वर इस्राएल लोक देवाला प्राणी आणि धान्ये अर्पण करत.

  • पवित्र शास्त्राच्या काळात, बऱ्याचदा साध्या सोप्या वेद्या मातीला दाबून मातीचा ढिगारा बनवून किंवा स्थिर ढिग तयार करण्यासाठी मोठ मोठे दगड एकमेकांवर ठेवून बनवल्या जात.
  • सोने, पितळ किंवा कांस्य धातूने आच्छादलेल्या काही विशिष्ट पेटीच्या आकाराच्या वेद्या लाकडाने बनविल्या होत्या.
  • इस्राएळ लोकांच्या जवळ राहणाऱ्या इतर लोकांच्या गटांनीही आपल्या दैवतांना बलिदान अर्पण करण्यासाठी वेद्या बांधल्या.

(हे सुद्धा पाहा: धूप जाळण्याची वेदी, खोट्या देवता, धान्य अर्पण, बलिदान)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • नोहा तारवाबाहेर आल्यानंतर,त्याने वेदी बांधली व अर्पणासाठी वापरल्या जाणा-या प्राण्यांपैकी प्रत्येक प्रकारातुन काही प्राण्यांचे देवाला होमार्पण केले.
  • जेंव्हा ते होमार्पणाच्या ठिकाणी जेंव्हा पोहोचले तेंव्हा अब्राहामाने आपला पुत्र इसहाक यास बांधले व वेदीवर ठेविले.
  • याजक त्या पशूस मारून त्याचे वेदीवर होमार्पण करत असे.

* मुर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळ‌त्याने जीवंत देवासाठी एक नवीन वेदी बांधली व त्यावर देवाला पशूबली अर्पण केला.

  • Strong's: H741, H2025, H4056, H4196, G1041, G2379