3.9 KiB
3.9 KiB
अमंगळ, किळस, वीट
व्याख्या:
"किळस" या शब्दाचा वापर एखाद्याचा तिटकारा किंवा अत्यंत नापसंती दर्शवण्यासाठी केला जातो.
- मिसरी लोकांना इब्री लोकांची किळस वाटत असे. याचा अर्थ असा मिसरी लोक इब्री लोकांस नापसंत करतात आणि त्यांच्याबरोबर सलग्न होत नाहीत किंवा त्यांच्या जवळ जात नाहीत.
- पवित्र शास्त्रामध्ये म्हटले आहे की अशा काही गोष्टी आहेत "ज्याचा यहोवाला वीट येतो" यात खोटेपणा, गर्व, मानवांचा त्याग करणे, मूर्तींची उपासना करणे, हत्या करणे आणि व्यभिचार व समलैंगिकता यासारख्या लैंगिक पापांचा समावेश आहे.
- शेवटल्या काळाविषयी आपल्या शिष्यांना शिकवताना, येशूने दानिएल संदेष्ट्याकडून झालेल्या भविष्यवाणीत "उजाडलेल्या गोष्टींची किळस" याविषयी सांगितले ज्यानी देवाच्या विरोधात बंड करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या उपासनेची जागा भ्रष्ट केली.
भाषांतर सूचना
- "किळस" या शब्दाचे भाषांतर "देवाला आवडत नसलेले काहीतरी" किंवा "किळसवाणी वस्तू" किंवा "तिरस्करणीय वागणूक" किंवा "अत्यंत वाईट कृती" असेही होऊ शकते.
- संदर्भाच्या आधारावर, "किळस आहे" असे वाक्यांश अनुवादित करण्याच्या पद्धतींमध्ये "मोठ्या प्रमाणावर द्वेष केला जातो" किंवा "किळसवाणी आहे" किंवा "पूर्णपणे अस्वीकार्य आहे" किंवा "अत्यंत वीट आणणारी" असू शकते.
- "उजाडलेल्या गोष्टींची किळस" या शब्दाचे भाषांतर "लोकांना मोठी दुखापत करणारी भ्रष्ट वस्तू" किंवा " मोठे दुःख देणारे अमंगळ कृत्य" म्हणून अनुवादित केले जाऊ शकते.
(हेही पहाः व्यभिचार, भ्रष्ट, उजाड, खोट्या देवता, अर्पण)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H887, H6292, H8251, H8262, H8263, H8441, G946